England Cricket : क्रिकेटविश्वात खळबळ! रेसॉर्टवर 6 दिवस पार्टी अन् इंग्लंडच्या खेळाडूंची झिंग उतरेना; इनसाईड फोटो आले समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
England Cricket investigate On alcohol : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत इंग्लंड 3-0 ने पिछाडीवर असताना इंग्लंडचे खेळाडू दारू पिण्यात आणि पार्टी करण्यात व्यस्थ असल्याचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
Rob Key comments England drinking : क्रिकेटचा जन्म ज्या देशात झाला त्या इंग्लंडने आज क्रिकेटला खाली मान घालायला लावली आहे. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात रोमांचक अशा अॅशेस कसोटी मालिकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं पहिल्या तीन कसोटी सामन्यामधून समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत इंग्लंड 3-0 ने पिछाडीवर असताना इंग्लंडचे खेळाडू दारू पिण्यात आणि पार्टी करण्यात व्यस्थ असल्याचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे.
प्रकरणात चौकशीचे आदेश दिले
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने गमावल्यानंतर त्यांनी ट्रॉफी गमावली. आता, इंग्लिश खेळाडूंवर मद्यपानाचे आरोप होत आहेत. मीडिया रिपोर्ट्स समोर आल्यानंतर इंग्लंड बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. ब्रिस्बेन कसोटी गमावल्यानंतर इंग्लिश खेळाडूंनी सलग सहा दिवस मद्यपान केले. यामध्ये नूसा शहरात सहा दिवसांच्या सुट्टी मागून पार्टी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
advertisement
इंग्लिश खेळाडू दारू पितानाचे फोटो लीक
दुसरी कसोटी गमावल्यानंतर, इंग्लंड क्रिकेट संघ क्वीन्सलँडमधील समुद्रकिनाऱ्यावरील शहरात विश्रांतीसाठी गेला. तेथे इंग्लिश खेळाडू दारू पितानाचे अनेक फोटो समोर आले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं. जर लोक म्हणत असतील की आमचे खेळाडू बाहेर गेले आणि खूप मद्यपान केले, तर निश्चितच चौकशी होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी जास्त मद्यपान करणं योग्य नाही. जर त्याची चौकशी झाली नाही तर ते चुकीचं ठरेल, असं इंग्लिश संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी म्हटलंय.
advertisement
England’s cricketers are making themselves right at home in Noosa. The players are following their captain's orders to the letter. @Tom_Wilson7 pic.twitter.com/HrfyP8Jyhd
— 7NEWS Melbourne (@7NewsMelbourne) December 9, 2025
एक ग्लास वाइन घेतली तर ते ठीक
advertisement
मी जे ऐकलं आहे त्यावरून असे दिसते की इंग्लंडचे खेळाडू मर्यादेत होते. गेल्या एक-दोन दिवसांत जे लिहिले आहे ते मी वाचले आहे. जर असे काही घडले असेल तर ते सहन केले जाणार नाही. मी मद्यपान करत नाही. मला वाटते की मद्यपान संस्कृती कोणालाही मदत करत नाही. जर खेळाडूंनी रात्रीच्या जेवणासोबत एक ग्लास वाइन घेतली तर ते ठीक आहे. त्यापेक्षा जास्त मद्यपान करणं निरुपयोगी असल्याचं रॉब यांनी म्हटलं आहे.
advertisement
इंग्लंडची निराशाजनक कामगिरी
दरम्यान, सध्याच्या मालिकेत इंग्लंडची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे, त्यांनी तिन्ही कसोटी सामने गमावले आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला अॅशेस राखता आली आहे. गेल्या 18 सामन्यांमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 8:55 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
England Cricket : क्रिकेटविश्वात खळबळ! रेसॉर्टवर 6 दिवस पार्टी अन् इंग्लंडच्या खेळाडूंची झिंग उतरेना; इनसाईड फोटो आले समोर










