Ind vs Pak : कॉपी करायची नाही!रोहित शर्माची स्ट्रेटेजी वापरताना पाकिस्तान तोंडावर आपटलं, मैदानावर काय ड्रामा झाला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानने रोहित शर्माची ट्रीक वापरून निकाल बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण पाकिस्तानच तोंडावर आपटलं होतं. त्यामुळे या दरम्यान मैदानात नेमका ड्रामा काय झाला होता?
Faheem trying Rishabh Pant trick : पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव करत टीम इंडियाने नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं होतं. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये सुरू असलेल्या वादानंतर भारतासाठी हा विजय खूप मोठा होता.या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करण्यासाठी अनेक डावपेच आखले होते.पण हे सगळे डावपेच हाणून पाडत भारताने विजय मिळवला होता. एक प्रसंग तर असा होता जिकडे पाकिस्तानने रोहित शर्माची ट्रीक वापरून निकाल बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण पाकिस्तानच तोंडावर आपटलं होतं. त्यामुळे या दरम्यान मैदानात नेमका ड्रामा काय झाला होता? हे जाणून घेऊयात.
खरं तर पाकिस्तानने दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती. पण सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबेने भारताचा विजय सोप्पा करून टाकला होता. दरम्यान सामना हातातून जात असल्याचे पाकिस्तानला कळताच त्यांनी रोहित शर्मा सारखी स्ट्रेटेजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Failed attempt by Faheem Ashraf and Pakistani Team to break the rhythm of Indian Players in the 19th over.
When they can’t win from us they try and cheat! pic.twitter.com/K4H3wxM3RW
— Team Saath Official🤝 (@TeamSaath) September 29, 2025
advertisement
या टप्प्यात भारताला 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता होती.त्यामुळे भारत सहज जिंकेल असे वाटत होते. त्याचवेळी पाकिस्तानचा फहीम दुखापतग्रस्त झाला होता. गोलंदाजी करताना त्याला त्रास होता. कारण दोनदा रनअप घेतल्यानंतर त्याने बॉलच टाकला नव्हता. त्यामुळे मैदानात फिजिओला बोलावले गेले आणि फहीमच्या पायाच्या दुखापतीवर उपचार सूरू झाले. या दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंना स्ट्रेटेजी बनवण्यासाठी काहीसा वेळ मिळाला होता.याच वेळाचा उपयोग त्यांनी केला होता. मात्र तरी देखील पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवता आलाच नाही.
advertisement
रिषभ पंतची स्टाईल मारायला गेला...
2024 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत फायनल सामना सूरू होता.हा सामना टीम इंडियाच्या हातून पुर्णत निसटला आणि टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर होती.कारण दक्षिण आफ्रिकेला 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या.त्यामुळे हा सामना जिंकणे अशक्यच होते.
या दरम्यान रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला आणि लगेच फिजिओला मैदानात बोलावून घेतले गेले. फिजिओने मैदानात रिषभ पंतची तपासणी सूरू केली.या तपासणीत भारताला साधारण 2-4 मिनिटे स्ट्रेटेजी ठरवण्यासाठी मिळाली. यामुळे जो दक्षिण आफ्रिका वेगाने धावा काढत होता.त्यांच्या मोमेंटमही हलला आणि भारताने डेव्हिड मिलरची विकेट काढून सामन्याचा निकाल पालटला. यासह भारताने वर्ल्ड कप जिंकला होता.
advertisement
दरम्यान या विजयाच्या अनेक महिन्यानंतर रिषभ पंतने त्याला दुखापत झाली नव्हती.या उलट तो स्ट्रेटेजीचा भाग होता असे सांगितले होते.त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील रिषभ पंतची स्ट्रेटेजी यशस्वी ठरली होती. अशीच स्ट्रेटेजी फहीम आखत असताना पाकिस्तान तोंडावर आपटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की होते आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Pak : कॉपी करायची नाही!रोहित शर्माची स्ट्रेटेजी वापरताना पाकिस्तान तोंडावर आपटलं, मैदानावर काय ड्रामा झाला?