advertisement

Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेता बनताच हर्षवर्धन सदगीरचा 12 व्या मिनिटाला कुस्तीला रामराम, चाहत्यांना मोठा धक्का

Last Updated:

या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना त्याने कुस्ती शौकीनांना मोठा धक्का दिला आहे.

Harshvardhan Sadgir retire
Harshvardhan Sadgir retire
Harshawardhan Sadgir Won Maharashtra Kesari 2026: पुण्याच्या वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने 'बाहुबली' महेंद्र गायकवाडचा 4-3 ने पराभव करत डबल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. या विजयानंतर कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.दरम्यान या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना त्याने कुस्ती शौकीनांना मोठा धक्का दिला आहे.
महाराष्ट्र केसरीच्या फायनल सामन्यात 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने पहिल्या मिनिटालाचा आक्रामक सुरुवात केली होती. तर अनुभवी हर्षवर्धन सदगीर संयमी खेळीने सूरूवात केली होती. यावेळी हर्षवर्धनला बाहेर केल्याने महेंद्रला एक गुण मिळाला होता. त्यानंतर महेंद्र गायकवाडचा दुहेरी पटाचा प्रयत्न हर्षवर्धन सदगीनरने धुडकावून लावला होता.  त्यानंतर हर्षवर्धन सदगीरला एक गुण देण्यात आला होता.कारण महेंद्रला ताकीद देऊन ही तसाच खेळ खेळत होता.शेवटी 3 मिनिटाच्या खेळानंतर सामना 1-1 बरोबरीत होता.
advertisement
सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख या दोन्ही दोन्ही मल्लांनी पहिल्या मिनिटापासून आक्रामक सूरूवात केली होती. यावेळी 'बाहुबली' महेंद्र  सिकंदर शेखने ताबा मिळवत दोन गुण मिळवले होते. त्यानंतर स्टेपआऊट करून महेंद्र गायकवाडला एक गुण पटकावून 3 गुणांची आघाडी घेतली होती.  त्यामुळे पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाड 3 गुण सिकंदर शेख शुन्य गुणावर होता.
advertisement
त्यानंतर महेंद्र गायकवाडला अॅक्टीव्हीटी पिरियडचा टाईम देण्यात आला होता. पण अॅक्टीव्हीटी पिरियडमध्ये महेंद्र गायकवाडला गुण घेता आला नाही, त्यामुळे हर्षवर्धनच्या खात्यात एक गुण आला. अशाप्रकारे त्याची दोन गुणांची आघाडी झाली.त्यानंतर पुन्हा एक डाव टाकत हर्षवर्धन सदगीरने दोन गुण पटकावले आणि 4 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या क्षणी महेंद्र गायकवाड हा आक्रामक होताना दिसला होता. शेवटी स्टेप आऊटचा महिंद्राने एक गुण मिळवला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणि हर्षवर्धन सदगीरने 4-3 अशा फरकाने सामना जिंकत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.
advertisement
दरम्यान या विजयानंतर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सदगीरने धक्कादायक निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन सदगीरने चांदीची गदा उचलताच 12 व्या मिनिटाला कुस्तीतुन निवृत्त घेत असल्याची घोषणा केली आहे.या त्याच्या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच मी सरकारकडे काम मागायला गेलो तर मला या सरकारने काम दिले नाही, असे म्हणत त्याने आपल्या मनातली खदखद देखील बोलून दाखवली होती.त्यानंतर शेवटी त्याने धन्यवाद तुम्ही प्रेम दिले म्हणत चाहत्यांचे आभार मानले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेता बनताच हर्षवर्धन सदगीरचा 12 व्या मिनिटाला कुस्तीला रामराम, चाहत्यांना मोठा धक्का
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement