advertisement

Arjun Tendulkar : 21 वर्षांनी पुन्हा आठवला मोईन खान, सचिनप्रमाणेच अर्जुननेही पायाखालून उडवला स्टंप, Video

Last Updated:

सचिन तेंडुलकरने 2004 साली घेतलेली मोईन खानची विकेट भारतीय क्रिकेट चाहते विसरू शकत नाहीत. 21 वर्षांनंतर आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने तसाच बोल्ड केला आहे.

21 वर्षांनी पुन्हा आठवला मोईन खान, सचिनप्रमाणेच अर्जुननेही पायाखालून उडवला स्टंप, Video
21 वर्षांनी पुन्हा आठवला मोईन खान, सचिनप्रमाणेच अर्जुननेही पायाखालून उडवला स्टंप, Video
मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने 2004 सालच्या पाकिस्तान दौऱ्यात मोईन खानची घेतलेली विकेट आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. मुलतान टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसाच्या शेवटी सचिनने टाकलेला लेग स्पिन मोईन खानच्या दोन पायांच्या मधून थेट स्टंपवर जाऊन आदळला, या विकेटनंतर सचिनने केलेलं सेलिब्रेशन कोणताच भारतीय क्रिकेट चाहता विसरू शकत नाही.
सचिन तेंडुलकरने घेतलेल्या या विकेटच्या 21 वर्षांनंतर त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही अगदी तशीच विकेट घेतली आहे. अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत गोव्याकडून खेळताना चंडीगढच्या बॅटरला यॉर्कर टाकला, हा बॉल बॅटरच्या पायाखालून थेट स्टंपवर जाऊन आदळला. अर्जुन तेंडुलकरची ही विकेट पाहून चाहत्यांना सचिन तेंडुलकरने घेतली मोईन खानची विकेट आठवली.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by krishhari10 (@cricket_10_srt)



advertisement

अर्जुनचा भेदक स्पेल

चंडीगढविरुद्धच्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने भेदक स्पेल टाकला. ओपनिंगला बॅटिंगला आलेला अर्जुन लवकर आऊट झाला, पण बॉलिंगमध्ये त्याने भेदक स्पेल टाकला. अर्जुनने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या. अर्जुनने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये चंडीगढचा कर्णधार शिवम भांबरीची विकेट घेतली, यानंतर त्याने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अर्जुन आझादला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 16 व्या ओव्हरमध्ये अर्जुनने जगजीत सिंगला बोल्ड केलं.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Inside Edge (@insideedge001)



advertisement
अर्जुनने टाकलेला यॉर्कर जगजीत सिंग याच्या पायाच्या मधून थेट स्टंपवर गेला. बुलेटच्या स्पीडने आलेला हा बॉल जगजीतला झेपलाच नाही आणि स्टंप हवेत उडला. अर्जुनच्या या बॉलिंगमुळे गोव्याने चंडीगढचा 52 रननी पराभव केला. पहिले बॅटिंग करणाऱ्या गोव्याने 20 ओव्हरमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यात 173 रन केले. गोव्याकडून ललित यादवीने 83 रनची खेळी केली. गोव्याच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चंडीगढचा 19 ओव्हरमध्ये 121 रनवर ऑलआऊट झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 21 वर्षांनी पुन्हा आठवला मोईन खान, सचिनप्रमाणेच अर्जुननेही पायाखालून उडवला स्टंप, Video
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement