IND vs PAK : 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही होणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, वर्ल्ड कपच्या टाईम टेबलची घोषणा

Last Updated:

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत, तरीही दोन्ही देशांमध्ये वर्ल्ड कपचा सामना होणार आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतरही होणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, वर्ल्ड कपच्या टाईम टेबलची घोषणा
'ऑपरेशन सिंदूर'नंतरही होणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, वर्ल्ड कपच्या टाईम टेबलची घोषणा
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'च्या रूपात चोख प्रत्युत्तर दिलं, यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधला व्यापार बंद झाला असून संवादही तुटला आहे. एकीकडे भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असतानाच दोन्ही देश वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आयसीसीने वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
30 सप्टेंबरपासून भारतात महिलांच्या वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे वर्ल्ड कप हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना 5 ऑक्टोबरला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
advertisement
या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला, त्यानंतर टीम इंडियाने त्यांचे सगळे सामने दुबईमध्ये खेळले. त्यामुळे आता पाकिस्ताननेही भारतात खेळणार नसल्याचं सांगितलं, या कारणामुळे पाकिस्तान त्यांचे सगळे सामने कोलंबोमध्ये खेळणार आहे.

2 नोव्हेंबरला होणार फायनल

महिला वनडे वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमध्ये एकूण 28 लीग मॅच होणार आहेत, यानंतर सेमी फायनल आणि फायनलचे 3 नॉक आऊट सामने होतील, जे बंगळुरू, इंदूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि कोलंबोमध्ये खेळवले जातील. पहिली सेमी फायनल 29 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये होईल, पण पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचली तर हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल. दुसरी सेमी फायनल 30 ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये होईल. 2 नोव्हेंबरला होणारी फायनलही बंगळुरू किंवा कोलंबोमध्ये होणार आहे.
advertisement

वेस्ट इंडिज खेळणार नाही

वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या टीमनी थेट क्वालिफाय केलं आहे. तर यावर्षीच्या सुरूवातीला लाहोरमध्ये झालेल्या क्वालिफायरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश क्वालिफाय होणाऱ्या शेवटच्या 2 टीम ठरल्या होत्या. वेस्ट इंडिज या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न झाल्यामुळे खेळणार नाही.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही होणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, वर्ल्ड कपच्या टाईम टेबलची घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement