Arshdeep Singh : अर्शदीपचा पेशन्स संपला, मॅचमध्ये गंभीरची बोलती बंद केली, मैदानाबाहेरही सुनावलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने त्याच्या बॉलिंगने टीम मॅनेजमेंटची बोलती बंद केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगला खेळण्याची संधी दिली जात नव्हती.
होबार्ट : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले. अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांना संधी देण्यात आली आहे, तर हर्षित राणा, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन यांना बाहेर करण्यात आलं. पहिल्या दोन्ही सामन्यात अर्शदीपला संधी न दिल्यामुळे कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांच्यावर मोठी टीका झाली, अखेर गंभीर आणि सूर्याने त्यांची चूक सुधारली आणि अर्शदीपला संधी दिली.
अर्शदीपनेही त्याला दिलेल्या या संधीचं सोनं केलं आणि मॅचच्या चौथ्या बॉलवरच विकेट घेतली. अर्शदीपने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 35 रन देऊन 3 विकेट घेतल्या. 26 वर्षांच्या अर्शदीप सिंगने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 104 विकेट घेतल्या आहेत. टी-20 स्पेशलिस्ट असूनही अर्शदीपला बेंचवर बसवलं गेलं होतं, पण संधी मिळताच त्याने आपल्या कामगिरीनेच पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. मॅचआधी अर्शदीप सिंगने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement

अर्शदीपच्या या पोस्टमुळे तो टीम मॅनेजमेंटवर नाराज आहे का? अशा चर्चाही रंगल्या, कारण अर्शदीपला बाहेर बसवून हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात होती. 'तुम्ही जे बीज (कर्म) रोवता, तेच फळ तुम्ही कापता (निकाल)' असं अर्शदीप त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणाला आहे. अर्शदीपने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नसल्यामुळे हा निशाणा कॅप्टन आणि कोचवर तर साधला नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
याआधी अर्शदीप सिंगची इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली होती, पण तिथेही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तसंच आशिया कपमध्येही अर्शदीप बेंचवरच बसून होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यातही डावललं गेल्यानंतर अर्शदीपची ही इन्स्टा स्टोरी समोर आली, त्यामुळे वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 5:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arshdeep Singh : अर्शदीपचा पेशन्स संपला, मॅचमध्ये गंभीरची बोलती बंद केली, मैदानाबाहेरही सुनावलं!


