IND vs AUS : विजयाच आधी क्रेडिट दिलं, मग सूर्याने सगळ्यांसमोर अभिषेकची उडवली खिल्ली,VIDEO VIRAL

Last Updated:

कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माची खिल्ली उडवली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

suryakumar yadav tease abhishek sharma
suryakumar yadav tease abhishek sharma
India vs Australia 4th t2oi : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 48 धावांनी विजय मिळवला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयाचा श्रेय शुभमन गिल आणि अभिषेक शर्माला दिलं होतं. यानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माची खिल्ली उडवली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये चौथ्या टी20 सामन्यानंतर भारताची संपूर्ण टीम बसमधून हॉटेलला जात होती.या दरम्यान बसजवळ जात असताता सूर्यकुमार यादव अभिषेकच्या खांद्यावर हात ठेवून एका रिपोर्टरला सांगतो, वाघाला गवत खाताना कधी पाहिलंय, (कभी देखा है शेर को घास खाते हुए) आज तो गवत खात होता हळू हळू (आज शेर घास खा रहा था धीरे धीरे)..यावर रिपोर्टर म्हणतो मी याच्याबद्दल एकही गोष्ट ऐकूण घेणार नाही. तर सूर्या यावर म्हणतो चांगली गोष्ट मी सांगतो आहे. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव बसमध्ये चढतात. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
advertisement
विजयानंतर अभिषेकचं कौतुक
टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल आहेत, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने या विजयाचं श्रेय शुभमन गिल आणि अभिषेक शर्माला दिलं. 'या विजयाचं श्रेय बॅटिंगला जातं, खासकरून अभिषेक आणि शुभमन. पॉवरप्लेमध्ये दोघांनी स्मार्ट सुरूवात करून दिली. ही 200 प्लसची खेळपट्टी नसल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं. प्रत्येकाने स्कोअर केला. ड्रेसिंग रूममधून पाठवलेले संदेश स्पष्ट होते. मी आणि गौती भाई एकाच पानावर आहोत', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
'दव पडत असताना बॉलरनही लगेच परिस्थिती जाणून घेत त्यानुसार बदल केले. त्यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली. दोन-तीन ओव्हर टाकणारे बॉलर असतील, तर चांगलंच आहे, पण हे परिस्थितीवर अवलंबून आहे. कधी वॉशिंग्टन चार ओव्हर टाकतो, तर कधी शिवम. ही लवचिकता आमच्यासाठी प्रभावी ठरते. टीमला काय हवं आहे, हे जाणून घेऊन ते करण्यासाठी प्रत्येक जण तयार असतो', असं म्हणत सूर्याने खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
advertisement
कसा रंगला सामना
भारताने दिलेल्या 168 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 119 रनवर ऑलआऊट झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून ओपनर मिचेल मार्शने 30 आणि मॅथ्यू शॉर्टने 25 रनची खेळी केली. यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली. त्याआधी भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 167 रन केले.वॉशिंग्टन सुंदरने 3 तर अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या. याशिवाय शिवम दुबेलाही 2 विकेट मिळाल्या. अर्शदीप, बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
शुभमन गिलने 46, अभिषेक शर्माने 28 रन केले. तर शिवम दुबेने 22 आणि सूर्यकुमार यादवने 20 रनची खेळी केली. अक्षर पटेलने 11 बॉलमध्ये नाबाद 21 रन करून टीमला 168 या सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : विजयाच आधी क्रेडिट दिलं, मग सूर्याने सगळ्यांसमोर अभिषेकची उडवली खिल्ली,VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement