IND vs NZ Final : अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार? मॅचला 24 तासच शिल्लक असताना सुनील गावस्करांनी घेतला फायनल कॉल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sunil Gavaskar On Abhishek Sharma : भारताचे माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम मॅनेजमेंटला एक धाडसी सल्ला दिला असून यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
IND vs NZ Final Sunil Gavaskar : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही तगडे संघ आमने सामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. अशातच आता टीम इंडियाला टेन्शन आहे ते म्हणजे भारताचा प्रिमियम बॅटर अभिषेक शर्मा याचं... अभिषेक शर्माला संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी पहावी लागली. अशातच भारताचे माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम मॅनेजमेंटला एक धाडसी सल्ला दिला असून यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
अभिषेक शर्माला बाहेर काढा
सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करावं, असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलंय. अभिषेक शर्मासाठी हा वर्ल्ड कप आतापर्यंत अत्यंत आव्हानात्मक राहिला आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याला केवळ एकदाच 50 रन्सचा टप्पा ओलांडता आला आहे. विशेषतः फिरकी गोलंदाजीसमोर तो वारंवार अडखळताना दिसला असून तब्बल 4 वेळा त्याला स्पिनर्सनी बाद केले आहे. विरोधी टीम्स आता पॉवरप्लेमध्येच स्पिनर्सचा वापर करून त्याच्या कमकुवत दुव्याचा फायदा घेत आहेत, ही भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे, असं गावस्कर म्हणाले.
advertisement
टी-ट्वेंटी रँकिंगमध्ये नंबर 1 पण...
हा अत्यंत कठीण निर्णय आहे कारण अभिषेक टी-ट्वेंटी रँकिंगमध्ये नंबर 1 वर आहे. मात्र, तो आपल्या चुकांमधून काहीही शिकताना दिसत नाही. ज्या झोनमध्ये त्याला हात उघडायला जागा मिळत नाही, तिथंच तो वारंवार विकेट गमावत आहे. बॉलर्स सातत्याने त्याच टप्प्यावर टार्गेट करत असून अभिषेकला आपला दृष्टिकोन बदलता येत नसल्याचं गावस्कर यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल यावर देखील भाष्य केलंय.
advertisement
रिंकू सिंगचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश
दरम्यान, संजू सॅमसनसोबत इशान किशनने ओपनिंगला यावं आणि अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंगचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा. रिंकूच्या समावेशामुळे मिडल ऑर्डर अधिक मजबूत होईल आणि त्याच्याकडे मॅच फिरवण्याची क्षमता आहे, असंही गावस्कर यावेळी म्हणाले आहेत. रिंकू सिंगबद्दल बोलताना गावस्कर यांनी त्याच्या 'गॉड प्लॅन' चाही उल्लेख केला. रिंकू सारख्या खेळाडूंकडे प्रचंड आत्मविश्वास असतो आणि कठीण प्रसंगात त्यांच्यासाठी गोष्टी सकारात्मक घडतात, असंही गावस्कर म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 7:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार? मॅचला 24 तासच शिल्लक असताना सुनील गावस्करांनी घेतला फायनल कॉल







