advertisement

Accident News : सकाळी कामावर निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठले; पनवेलमधील त्या भीषण अपघाताने नागरिक सुन्न

Last Updated:

Panvel Accident News : कामावर निघाल्यानंतर पुढे काही भयंकर होईल असं मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना कधीच वाटलं नव्हतं. मनोज सोबत वाटेतच काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.

Panvel Tanker Accident
Panvel Tanker Accident
नवी मुंबई : पनवेल शहरातून एक अत्यंत दुर्देवी घटना समोर आलेली आहे. जिथे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
कामावर जाताना घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या धडकेत मनोज रामजी कांबळे (वय 38) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत मनोज कांबळे हे ऊसर्ली गावातील एका सोसायटी येथे कुटुंबासह राहत होते. घटनेदिवशी अर्थात शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडले होते. दरम्यान ऊसर्ली गावाजवळ ते पोहोचले असताना समोरून येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली.
advertisement
या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान या अपघातानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच टँकर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Accident News : सकाळी कामावर निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठले; पनवेलमधील त्या भीषण अपघाताने नागरिक सुन्न
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement