Shreyas Iyer : ...तरच श्रेयस अय्यरचं टीम इंडियात कमबॅक होणार, BCCI ने अट घातली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताच्या वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे मॅचवेळी श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती.
मुंबई : भारताच्या वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे मॅचवेळी श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती, यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळला नव्हता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये अय्यरची निवड होणार का नाही? याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. न्यूझीलंड सीरिजसाठी निवड होण्यासाठी श्रेयस अय्यरसमोर अट ठेवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधून 'रिटर्न टू प्ले' ला मंजूरी मिळण्यासाठी दोन मॅच सिम्युलेशन सेशन्स पास करावे लागणार आहेत. श्रेयस अय्यरने बॅटिंग आणि फिल्डिंगचे चार सेशन पास केले आहेत, पण त्याचा सध्याचा फिटनेस पाहता दोन मॅच सिम्युलेशन सेशन आयोजित केले जाणार आहेत. हे दोन सेशन 2 आणि 5 जानेवारीला होणार आहेत. मॅच सिम्युलेशन सेशन म्हणजे श्रेयस अय्यरला मॅचसाठी लागतो तितका फिटनेस दाखवावा लागणार आहे.
advertisement
श्रेयस अय्यरचं पुनरागमन आधीच होणार होतं, पण त्याचं मसल मास कमी झाल्यामुळे हे कमबॅक लांबणीवर पडलं. दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचं वजन 6 किलोनी कमी झालं, त्यामुळे मेडिकल टीमला कोणताही धोका पत्करायचा नव्हता, अन्यथा श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणार होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड 3 जानेवारीला होणार आहे, या सीरिजसाठी अय्यरला संधी मिळणं कठीण आहे.
advertisement
श्रेयस अय्यरचं न्यूझीलंड सीरिजसाठी कमबॅक झालं तर ऋतुराज गायकवाडला टीमबाहेर जावं लागू शकतं. अय्यरच्या गैरहजेरीमध्ये ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली आणि शतकही झळकावलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये देवदत्त पडिक्कलचं टीम इंडियात कमबॅक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळताना पडिक्कलने 4 सामन्यांमध्ये 3 शतकं केली आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 5:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : ...तरच श्रेयस अय्यरचं टीम इंडियात कमबॅक होणार, BCCI ने अट घातली!










