IND vs PAK : 'हारिस राऊफने प्लेन पाडलं, पण आम्ही...', पाकिस्तानच्या विकृतीवर टीम इंडियाची पहिली रिएक्शन
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये रविवारी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली, पण या सामन्यात पाकिस्तानचा फास्ट बॉलर हारिस राऊफने केलेल्या हावभावांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
दुबई : आशिया कपमध्ये रविवारी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली, पण या सामन्यात पाकिस्तानचा फास्ट बॉलर हारिस राऊफने केलेल्या हावभावांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हारिस राऊफच्या या हावभावांमुळे त्याच्यावर मैदानात आणि मैदानाबाहेरही टीका होत आहे.
टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना हारिस राऊफने स्टेडियममध्ये असलेल्या भारतीय प्रेक्षकांना पाहून 6-0 चे हावभाव केले. यावर्षी मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, पण पाकिस्तानने मात्र आपण भारताची लढाऊ विमाने पाडल्याचे निराधार दावे केले. तो संदर्भ घेऊन हारिसने 6-0 चे इशारे भारतीय चाहत्यांकडे पाहून केले, तसंच त्याने विमान पाडल्याचे हावभावही करून दाखवले.
advertisement
हारिस राऊफच्या या हावभावांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. हारिस राऊफच्या या कृत्याबद्दल भारतीय चाहत्यांनी त्याची जोरदार खिल्ली उडवली. बुधवारी टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या त्यांच्या सुपर-4 च्या सामन्याची तयारी करत होती, तेव्हा पत्रकारांनी टीम इंडियाला राऊफच्या कृतीबद्दल विचारलं.
टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकांनी हारिस राऊफबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'हॅरिसने काही गोष्टी केल्या, तो आमच्या चिंतेचा विषय नाही. आम्ही बॅटने लढलो आणि त्यांना आमची ताकद दाखवली', असं उत्तर टीम इंडियाकडून देण्यात आलं आहे. भारताने सुपर-4 मध्ये पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला, त्याआधी ग्रुप स्टेजमध्येही भारताने पाकिस्तानला मात दिली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 11:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'हारिस राऊफने प्लेन पाडलं, पण आम्ही...', पाकिस्तानच्या विकृतीवर टीम इंडियाची पहिली रिएक्शन