IND vs SA : 31व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फिरली मॅच, बऊमाच्या ट्रम्प कार्डने टीम इंडियाचा खेळ खल्लास!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा फक्त 93 रनवर ऑलआऊट झाला.

31व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फिरली मॅच, बऊमाच्या ट्रम्प कार्डने टीम इंडियाचा खेळ खल्लास!
31व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फिरली मॅच, बऊमाच्या ट्रम्प कार्डने टीम इंडियाचा खेळ खल्लास!
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा फक्त 93 रनवर ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा आणि स्पिनर असलेला सिमन हार्मर विजयाचे शिल्पकार ठरले. ईडन गार्डनच्या कठीण खेळपट्टीवर हार्मरने दोन्ही इनिंगमध्ये 4-4 विकेट घेतल्या, तर टेम्बा बऊमाने कठीण खेळपट्टीवर झुंजार अर्धशतक केलं.
दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. 1 रनवरच यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे दोन्ही ओपनर माघारी परतले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने एकट्याने किल्ला लढवायला सुरूवात केली. बॅटिंगसाठी कठीण असलेल्या या खेळपट्टीवर वॉशिंग्टन सुंदर सेट झाला होता, पण तेव्हाच टेम्बा बऊमाने त्याचं ट्रम्प कार्ड बाहेर काढलं.
बऊमाने एडन मार्करमच्या हातात बॉल दिला आणि त्याने जादू केली. 31 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला वॉशिंग्टन सुंदर आऊट झाला. मार्करमने टाकलेला बॉल सुंदरच्या बॅटला लागून पहिल्या स्लिपमध्ये गेला आणि हार्मरने त्याचा कॅच पकडला. 92 बॉलमध्ये 31 रन करून सुंदर पॅव्हेलियनमध्ये परतला. सुंदरची विकेट गेल्यानंतर मात्र कोणत्याही भारतीय बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही.
advertisement
सिमन हार्मरच्या 4 विकेटशिवाय मार्को यानसन आणि केशव महाराज यांना 2-2 आणि एडन मार्करमला 1 विकेट घेण्यात यश आलं. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 31, अक्षर पटेलने 26 आणि रवींद्र जडेजाने 18 रन केले. मागच्या एका वर्षातला टीम इंडियाचा घरच्या मैदानातला 6 सामन्यांमधला हा चौथा पराभव आहे. न्यूझीलंडने 3-0 ने हरवल्यानंतर आता भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रणनीतीवर टीकेची झोड उठली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 31व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फिरली मॅच, बऊमाच्या ट्रम्प कार्डने टीम इंडियाचा खेळ खल्लास!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement