IND vs SA : 'माझंच चुकलं...', पराभवानंतर केएल राहुलची धक्कादायक कबुली, तिघांवर फोडलं खापर!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 359 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 49.2 ओव्हरमध्येच पार केलं.

'माझंच चुकलं...', पराभवानंतर केएल राहुलची धक्कादायक कबुली, तिघांवर फोडलं खापर!
'माझंच चुकलं...', पराभवानंतर केएल राहुलची धक्कादायक कबुली, तिघांवर फोडलं खापर!
रायपूर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 359 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 49.2 ओव्हरमध्येच पार केलं. एडन मार्करमचं शतक तसंच मॅथ्यू ब्रीट्झकी आणि डेवाल्ड ब्रेविसच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या देशाबाहेरचा सगळ्यात मोठा विजय मिळवला. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. दुसऱ्या वनडेमध्ये झालेल्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोस्ट मॅच प्रेझेनटेशनमध्ये केएल राहुलने या पराभवाचं खापर तीन गोष्टींवर फोडलं आहे.

टॉस जिंकावा लागेल

टीम इंडियाला वनडे क्रिकेटमधले मागचे 20 टॉस जिंकता आलेले नाहीत. वनडे क्रिकेटमध्ये भारताने शेवटचा टॉस 2023 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला न्यूझीलंडविरुद्ध जिंकला. केएल राहुलने रायपूरमधल्या पराभवाचं हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं. मैदानामध्ये प्रचंड दव होतं, त्यामुळे बॉलरना बॉल पकडणंही कठीण झालं होतं, दव असताना टॉस महत्त्वाची भूमिका बजावतो, टॉस हरल्याबद्दल मी स्वत:लाच दोष देतो, असं राहुल म्हणाला आहे.
advertisement

20-25 रन जास्त गरजेच्या

सामन्यामध्ये आम्ही आणखी काही गोष्टी चांगल्या करू शकलो असतो. आपण 20-25 रन जास्त करून बॉलरना मदत कशी करू शकतो, यावर ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली, असं वक्तव्य राहुलने केलं आहे. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात पार्टनरशीप सुरू होती, तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 400 रनच्या जवळ पोहोचेल, असं वाटत होतं. पण दोघांचीही विकेट गेल्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंगला ब्रेक लागला आणि 50 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 358 पर्यंतच पोहोचला.
advertisement

फिल्डिंग सुधारण्याची गरज

फिल्डिंगमध्येही आम्ही चुका करून रन दिल्याचं केएल राहुलने मान्य केलं. यशस्वी जयस्वालने एडन मार्करमचा 53 रनवर कॅच सोडला, त्यानंतर मार्करमने शतकी खेळी केली. तसंच टीम इंडियाची ग्राऊंड फिल्डिंगही खराब झाली, ज्यामुळे तीन ते चार फोरही गेल्या. आता विशाखापट्टणममध्ये होणारी तिसरी वनडे दोन्ही टीमसाठी करो या मरो आहे, त्यामुळे भारताला सीरिज जिंकण्यासाठी या सामन्यात केलेल्या चुका सुधाराव्या लागतील.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'माझंच चुकलं...', पराभवानंतर केएल राहुलची धक्कादायक कबुली, तिघांवर फोडलं खापर!
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement