Rishabh Pant Injury : पंतच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिले अपडेट, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
- Published by:Suraj
Last Updated:
Rishabh Pant Injury Update : भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत झालीय. पंतच्या दुखापतीबाबात बीसीसीआयने अपडेट दिले असून टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
बंगळुरू : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामान सुरू झाला. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव फक्त ४६ धावात आटोपला. त्यानंतर क्षेत्ररक्षणाला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत झालीय. पंतच्या दुखापतीबाबात बीसीसीआयने अपडेट दिले आहेत.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर काही वेळातच त्याच्या गुडघ्याला सूज आली. ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर ज्या गुडघ्याला शस्त्रक्रिया केली त्याच गुडघ्याला आता चेंडू लागून दुखापत झालीय.
बीसीसीआयने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितलं की, ऋषभ पंत तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षण करणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करेल. दुखापतीमुळे पंत यष्टीरक्षण करू शकणार नाही. ऋषभ पंतवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. रविंद्र जडेजाचा चेंडू पंतच्या पायावर लागला.
advertisement
अपघातात ज्या पायाला दुखापत झाली होती त्यावरच चेंडू लागल्याने पंतला वेदना झाल्या. पंतच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाचीसुद्धा डोकेदुखी वाढलीय. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेसाठी ऋषभ पंत महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. गेल्या वेळी मालिकेत भारताला विजय मिळवून देण्यात पंतची महत्त्वाची भूमिका होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2024 10:04 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rishabh Pant Injury : पंतच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिले अपडेट, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं