डबल-क्लिअरची जादू! आशिष लिमयेने इतिहास रचला, आशियाई इव्हेंटिंगमध्ये भारताला पहिले गोल्ड

Last Updated:

भारताच्या आशिष लिमये यांनी FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास घडवत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून भारताच्या इव्हेंटिंग क्षेत्रात नवी पर्वणी सुरू केली आहे.

शाब्बास पठ्ठ्या! थायलंडमध्ये भारताच्या प्रसादने सुवर्णपदकावर कोरलं नाव; Hourse Eventingमध्ये जबरदस्त कामगिरी
शाब्बास पठ्ठ्या! थायलंडमध्ये भारताच्या प्रसादने सुवर्णपदकावर कोरलं नाव; Hourse Eventingमध्ये जबरदस्त कामगिरी
भारताच्या आशिष लिमये यांनी FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास घडवत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून भारताच्या इव्हेंटिंग क्षेत्रात नवी पर्वणी सुरू केली आहे. त्यांच्या अत्यंत समन्वय आणि विश्वास असलेल्या साथीदार ‘विली बी डन’ सोबत 29.4 पेनल्टींवर समाप्त करत त्यांनी अत्यंत दबावाखाली देखील स्थिर, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या शुद्ध कामगिरी सादर केली आहे. क्रॉस-कंट्री आणि जंपिंग फेजमध्ये मिळालेल्या डबल– क्लिअर कामगिरीमुळे लिमाये यांना अंतिम विजयाचा निर्णायक फायदा मिळाला.
लिमाये यांनी पदक मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आज माझा घोडा सुपर– मोडमध्ये होता. काही चुका माझ्याकडून झाल्या, पण तो मला वाचवत राहिला. आजचा सुवर्ण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. विशेषतः मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत झालेले अपयश लक्षात घेता, आज मी स्वतःला रिडीम केलं आहे.” ‘विली बी डन’च्या त्यांच्या जीवनात येण्याविषयी प्रसाद लिमाये म्हणाले,
advertisement
“मी हा घोडा प्रत्यक्ष न पाहताच फक्त व्हिडिओवरून विकत घेतला होता आणि तो आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. आज तो केवळ माझा स्पर्धक नाही, तर माझा साथीदार आहे.”
ही कामगिरी भारताच्या इव्हेंटिंग इतिहासातील एक अभूतपूर्व क्षण मानला जात आहे. लिमाये यांच्या विजयाने भारतीय रायडर्सना नवी प्रेरणा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची इव्हेंटिंगमधील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे. क्रीडा तज्ञांच्या मते, लिमाये यांची कामगिरी, कौशल्य, संयम आणि रायडर घोडा यांच्यातील अभेद्य विश्वास याचे परिपूर्ण उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
डबल-क्लिअरची जादू! आशिष लिमयेने इतिहास रचला, आशियाई इव्हेंटिंगमध्ये भारताला पहिले गोल्ड
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement