'IPL Final चा खरा व्हिलन मीच', पराभवाच्या 8 दिवसानंतरही पंजाबचा खेळाडू 'डिप्रेशन'मध्ये!

Last Updated:

आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 ची फायनल खेळवली गेली, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा 6 रननी पराभव केला.

'IPL Final चा खरा व्हिलन मीच', पराभवाच्या 8 दिवसानंतरही पंजाबचा खेळाडू 'डिप्रेशन'मध्ये!
'IPL Final चा खरा व्हिलन मीच', पराभवाच्या 8 दिवसानंतरही पंजाबचा खेळाडू 'डिप्रेशन'मध्ये!
मुंबई : आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 ची फायनल खेळवली गेली, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा 6 रननी पराभव केला. फायनलमध्ये पंजाबच्या शशांक सिंग वगळता इतर कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धमाका केलेल्या नेहल वढेराकडून पंजाबच्या चाहत्यांना फायनलमध्ये अपेक्षा होता, पण त्यानेही निराशा केली. फायनलमध्ये नेहल वढेराला फक्त 15 रन करता आल्या आणि वाईट शॉट खेळून वढेरा आऊट झाला.

पराभवाला मीच जबाबदार

आयपीएल फायनलमधल्या या पराभवानंतर नेहल वढेराने स्वतःलाच दोषी धरलं आहे. 'मी स्वतःला दोष देतो, जर मी त्यावेळी थोडा चांगला खेळलो असतो, तर आम्ही जिंकलो असतो. मी खेळपट्टीला दोष देणार नाही, कारण आरसीबीने तिथे 190 रन केल्या होत्या. मी मॅच शेवटपर्यंत न्यायचा प्रयत्न करत होतो. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेली पाहिजे आणि मग संपवली पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यादिवशी मी मॅच संपवू शकलो नाही. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आधीच्या सामन्यांमध्ये मी जलद बॅटिंग केली, पण शेवटच्या सामन्यात गोष्टी माझ्या बाजूने गेल्या नाहीत', अशी कबुली नेहल वढेराने दिली आहे.
advertisement
'कधीकधी तुमचा दिवस नसतो. मी शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करत होतो, याचे मला वाईट वाटत नाही कारण आम्ही नियमित अंतराने विकेट गमावत होतो. पण मला वाटते की मी जलद खेळू शकलो असतो', अशी प्रतिक्रिया नेहल वढेराने दिली आहे.

आरसीबीने जिंकली पहिली ट्रॉफी

आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 190 रन केल्या. विराटने सर्वाधिक 43 तर कर्णधार रजत पाटीदारने 26 रन केल्या, याशिवाय मयंक अग्रवालने 24, जितेश शर्माने 24 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 25 रनचं योगदान दिलं.
advertisement
या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 184 रन करता आल्या. शशांक सिंग व्यतिरिक्त जॉश इंग्लिसने 39 रन केल्या तर प्रभसिमरन सिंगने 26 रनची खेळी केली. नेहल वढेराने आयपीएल 2025 मध्ये 16 सामन्यांमध्ये 145 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 369 रन केल्या, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 70 रन ही त्याची यंदाच्या मोसमातली सर्वोच्च धावसंख्या होती.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'IPL Final चा खरा व्हिलन मीच', पराभवाच्या 8 दिवसानंतरही पंजाबचा खेळाडू 'डिप्रेशन'मध्ये!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement