IPL 2026 : KKR चा रिटेनशन प्लान 24 तास आधीच लिक, रहाणे राहणार का जाणार? शाहरुखचा निर्णय फिक्स झाला!

Last Updated:

आयपीएल 2026 साठी खेळाडू रिटेन आणि रिलीज करायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सगळ्या 10 टीमना ही यादी जाहीर करावी लागणार आहे.

KKR चा रिटेनशन प्लान 24 तास आधीच लिक, रहाणे राहणार का जाणार? शाहरुखचा निर्णय फिक्स झाला!
KKR चा रिटेनशन प्लान 24 तास आधीच लिक, रहाणे राहणार का जाणार? शाहरुखचा निर्णय फिक्स झाला!
मुंबई : आयपीएल 2026 साठी खेळाडू रिटेन आणि रिलीज करायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सगळ्या 10 टीमना ही यादी जाहीर करावी लागणार आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात शाहरुख खानच्या केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळलेल्या केकेआरला प्ले-ऑफमध्येही जाता आलं नाही. तसंच मागच्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने शेवटच्या क्षणी पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड गेलेल्या अजिंक्य रहाणेला 1.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं, तसंच त्याला कर्णधारही बनवलं.
आता आयपीएल 2026 च्या मोसमाआधी केकेआर अजिंक्य रहाणेला रिलीज करेल, असं बोललं जात होतं. पण क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अजिंक्य रहाणेला केकेआर रिलीज करणार नाही, एवढंच नाही तर रहाणेच केकेआरचा कर्णधार राहील. अजिंक्य रहाणे केकेआरचा मागच्या मोसमातला सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता, त्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 390 रन केले होते.
advertisement

दिल्लीसोबतची बोलणी फिस्कटली

केकेआरची केएल राहुलसाठी दिल्ली कॅपिटल्ससोबत बोलणी सुरू होती. तसंच राहुलला केकेआरचा कॅप्टनही होऊ शकला असता, पण दिल्ली कॅपिटल्सच्या दोन पैकी एका मालकाने केएल राहुलला सोडायला नकार दिला, त्यामुळे रहाणेच केकेआरचा कर्णधार राहणार आहे.

अय्यरला सोडणार शाहरुख

दुसरीकडे केकेआर मागच्या लिलावातला त्यांचा सगळ्यात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यरला सोडणार आहे. आयपीएलच्या मागच्या लिलावात केकेआरने अय्यरला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण 11 सामन्यांमध्ये त्याला फक्त 142 रन करता आल्या. आयपीएलच्या मागच्या काही मोसमांपासून व्यंकटेश अय्यर केकेआरच्या टीमचा महत्त्वाचा भाग होता. केकेआरने 2024 आयपीएल जिंकली तेव्हा अय्यरची भूमिका मोलाची होती, त्यामुळे केकेआर अय्यरला लिलावात पुन्हा एकदा कमी किंमतीत विकत घेण्याची शक्यता आहे.
advertisement

आणखी कुणाला सोडणार केकेआर?

व्यंकटेश अय्यरशिवाय केकेआर क्विंटन डिकॉक (3.6 कोटी) आणि एनरिक नॉर्किया (6.5 कोटी) यांनाही रिलीज करण्याची शक्यता आहे. हे खेळाडू सोडल्यानंतर केकेआरकडे लिलावामध्ये 35-40 कोटी रुपये शिल्लक राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे केकेआर लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला विकत घेण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : KKR चा रिटेनशन प्लान 24 तास आधीच लिक, रहाणे राहणार का जाणार? शाहरुखचा निर्णय फिक्स झाला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement