advertisement

IPL 2026 : धोनीला नीट चालताही येईना... कसाबसा ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला, CSK ला वेदना देणारा Video

Last Updated:

आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात झाली आहे, पण त्याआधीच चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा सगळ्यात मोठा स्टार एमएस धोनी कमीत कमी 2 आठवड्यांसाठी आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

धोनीला नीट चालताही येईना... कसाबसा ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला, CSK ला वेदना देणारा Video
धोनीला नीट चालताही येईना... कसाबसा ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला, CSK ला वेदना देणारा Video
चेन्नई : आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात झाली आहे, पण त्याआधीच चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा सगळ्यात मोठा स्टार एमएस धोनी कमीत कमी 2 आठवड्यांसाठी आयपीएलमधून बाहेर झाला आहे. सीएसकेने धोनीच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. धोनीच्या पिंडलीच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं सीएसकेकडून सांगण्यात आलं आहे. 30 मार्चला सीएसके त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.

धोनी किती मॅचना मुकणार?

एमएस धोनी जवळपास 2 आठवडे आयपीएलमधून बाहेर होऊ शकतो. या दोन आठवड्यांमध्ये चेन्नई 4 मॅच खेळणार आहे. पहिली मॅच 30 मार्चला राजस्थानविरुद्ध गुवाहाटीमध्ये तर दुसरी मॅच 3 एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नईमध्ये होईल. यानंतर 5 एप्रिलला सीएसकेचा सामना आरसीबीविरुद्ध आणि 11 एप्रिलला दिल्लीविरुद्ध होणार आहे. पहिल्या 2 आठवड्यांमध्ये सीएसके 4 मॅच खेळणार आहे.
advertisement
advertisement
एमएस धोनीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत, ज्यात धोनीला चालतानाही वेदना होत असल्याचं दिसत आहे. नेट प्रॅक्टिस झाल्यानंतर धोनी स्वत:ची किट बॅग घेऊन ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात आहे, पण मैदान सोडून जात असताना धोनीला त्रास जाणवत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. एमएस धोनी हा 44 वर्षांचा आहे, त्यामुळे तो आयपीएल खेळणार का नाही? याबाबत सुरूवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं.
advertisement

चेन्नई सुपर किंग्सचं शेड्यूल

30 मार्च : राजस्थानविरुद्ध (गुवाहाटी)- 7.30 वाजता
3 एप्रिल : पंजाब किंग्सविरुद्ध (चेन्नई)- 7.30 वाजता
5 एप्रिल : आरसीबीविरुद्ध (बंगळुरू)- 7.30 वाजता
11 एप्रिल : दिल्लीविरुद्ध (चेन्नई)- 7.30 वाजता
14 एप्रिल : केकेआरविरुद्ध (चेन्नई)- 7.30 वाजता
18 एप्रिल : सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (हैदराबाद)- 7.30 वाजता
23 एप्रिल : मुंबई इंडियन्सविरुद्ध (मुंबई) - 7.30 वाजता
advertisement
26 एप्रिल : गुजरात टायटन्सविरुद्ध (अहमदाबाद)- 3.30 वाजता
2 मे : मुंबई इंडियन्सविरुद्ध (चेन्नई)- 7.30 वाजता
5 मे : दिल्लीविरुद्ध (दिल्ली)- 7.30 वाजता
10 मे : लखनऊविरुद्ध (चेन्नई)- 7.30 वाजता
15 मे : लखनऊविरुद्ध (लखनऊ)- 7.30 वाजता
18 मे : सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (चेन्नई)- 7.30 वाजता
21 मे : गुजरात टायटन्स (चेन्नई)- 7.30 वाजता
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : धोनीला नीट चालताही येईना... कसाबसा ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला, CSK ला वेदना देणारा Video
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement