Mumbai Indians : ना रोहित बोलला, ना हार्दिक... बुमराह फिट आहे का नाही? मुंबईच्या कोचने सगळ्यांसमोर खरं सांगितलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 ला सुरूवात झाली आहे. आयपीएल इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना रविवारी केकेआरविरुद्ध खेळणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 ला सुरूवात झाली आहे. आयपीएल इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना रविवारी केकेआरविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे, पण या मॅचआधी जसप्रीत बुमराह खेळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मुंबई इंडियन्सचा कोच महेला जयवर्धने याने जसप्रीत बुमराह खेळणार का नाही? याबाबत उत्तर दिलं आहे.
जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये यायच्या आधी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये गेला होता, त्यामुळे बुमराहच्या फिटनेसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. बुमराह मुंबईच्या टीममध्ये उशिरा आला, हे नियोजित प्रक्रियेचा भाग होतं, असं महेला जयवर्धने म्हणाला आहे.
बुमराह सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये
आयपीएल सुरू व्हायच्या एक आठवडा आधी बुमराह बंगळूरुमध्ये बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचला होता, त्यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला नाही. बुमराह वर्क लोड मॅनेजमेंटसाठी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गेला होता. शुक्रवारी संध्याकाळी बुमराह मुंबईत परतला आणि टीममध्ये सामील झाला.
advertisement
'भारतीय खेळाडूंवर टी-20 वर्ल्ड कपची तयारी करावी लागली, वर्ल्ड कपमध्ये त्यांच्यावर खूपच ताण होता. खेळाडू खूप क्रिकेट खेळले आहेत. वर्ल्ड कपआधी टेस्ट सीरिजही झाल्या, त्यामुळे बुमराहचं सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जाणं अपेक्षित होतं', असं वक्तव्य महेला जयवर्धनेने केलं आहे.
बुमराह खेळणार का नाही?
'खेळाडूंवर वर्ल्ड कपचा ताण खूप तीव्र होता. खेळण्यासोबतच त्यांनी प्रवासही केला. आयपीएलवेळी अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होईल, हे आम्हाला माहिती होतं. आम्हाला हे सांभाळून घ्यायचं आहे. बुमराह टीममध्ये परत आला आहे. तो खेळण्यासाठी उपलब्ध आहे', अशी गूड न्यूज महेला जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना दिली आहे.
advertisement
जॅक्स-सॅन्टनरचा सस्पेन्स
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आला असला तरी मुंबई इंडियन्सचे दोन मॅच विनर विल जॅक्स आणि मिचेल सॅन्टनर यांच्याबाबत मात्र सस्पेन्स निर्माण झाला आहे. विल जॅक्स आणि सॅन्टनर मुंबईच्या टीममध्ये पोहोचले नसल्याचं वृत्त आहे. जॅक्स आणि सॅन्टनर उपलब्ध नसतील तर मुंबई परदेशी खेळाडू म्हणून क्विंटन डिकॉक, शरफेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश आणि ट्रेन्ट बोल्ट यांना संधी देऊ शकते. परदेशी स्पिन बॉलर हवा असला तर मुंबईकडे अल्लाह गझनफरचा पर्यायही उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 8:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : ना रोहित बोलला, ना हार्दिक... बुमराह फिट आहे का नाही? मुंबईच्या कोचने सगळ्यांसमोर खरं सांगितलं!








