advertisement

World Cup : 'वर्ल्ड कप'च्या मॅच तडकाफडकी रद्द, इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर!

Last Updated:

इराण-अमेरिका युद्धाचे परिणाम आता क्रिकेट विश्वावरही होत आहे. अमेरिका-इज्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे वर्ल्ड कपच्या मॅच रद्द करण्यात आल्या आहेत.

'वर्ल्ड कप'च्या मॅच तडकाफडकी रद्द, इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर!
'वर्ल्ड कप'च्या मॅच तडकाफडकी रद्द, इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर!
मुंबई : इराण-अमेरिका युद्धाचे परिणाम आता क्रिकेट विश्वावरही होत आहे. भारतामध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे. हा टी-20 वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे, तर दुसरी सेमी फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. एकीकडे भारतात वर्ल्ड कप सुरू असतानाच स्पर्धेतून बाहेर झालेल्या झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या टीम भारतात अडकल्या आहेत. इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे टीमना त्यांच्या देशामध्ये जायला विमानच मिळत नाहीयेत. मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले होत असल्यामुळे युएई आणि आसपासच्या भागात विमानसेवा रद्द करण्यात आली आहे, त्यातच आता वर्ल्ड कपच्या सामन्यांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
अमेरिका-इज्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2 च्या मॅच रद्द करण्यात आल्या आहेत. नेपाळच्या काठमांडूमधल्या त्रिभुवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर नेपाळ, ओमान आणि युएई यांच्यात ट्राय सीरिज होणार होती, पण सुरक्षेच्या कारणास्तव या ट्राय सीरिजच्या 6 मॅच रद्द करण्यात आल्या आहेत.
नेपाळ क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर सीरिज रद्द झाल्याची माहिती दिली आहे. इतर देशांच्या बोर्डांसोबत चर्चा केल्यानंतर नव्या तारखांची घोषणा केली जाईल, असं नेपाळ क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2 च्या मॅच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये 10 मार्चपासून सुरू होणार होत्या, पण सगळ्या क्रिकेट बोर्डांनी चर्चा करून ट्राय सीरिज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement

काय आहे मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप लीग?

आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेली वर्ल्ड कप लीग-2 पुढच्या वर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या क्वालिफिकेशनचा महत्त्वाचा भाग आहे. 2027 वनडे वर्ल्ड कप पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. वर्ल्ड कप लीग-2 ही 8 टीमची आहे जी जवळपास 3 वर्ष खेळवली जाते. यातल्या टॉप-4 टीमना 10 टीमच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळते. वर्ल्ड कप लीग-2 अंतर्गत येणारी ट्राय सीरिज 10 मार्चपासून नेपाळ, युएई आणि ओमान यांच्यात सुरू होणार होती, पण इराण आणि आसपासची परिस्थिती खराब झाल्यामुळे सीरिज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. लीग-2 चा पुढचा राऊंड एप्रिलच्या सुरूवातीला होणार आहे, ज्यात स्कॉटलंड, ओमान आणि नामिबिया खेळणार आहेत.
advertisement
इराण आणि आजूबाजूच्या देशांमधील खराब परिस्थितीचा परिणाम इतर खेळांवरही झाला आहे. भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू दुबईमध्ये अडकली होती. आता ती भारतात परत आली आहे, त्यामुळे ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधूला सहभागी होता आलं नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup : 'वर्ल्ड कप'च्या मॅच तडकाफडकी रद्द, इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर!
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement