advertisement

T20 वर्ल्ड कपनंतर ईशान किशन बोहल्यावर चढणार? पाकिस्तानच्या मॅचआधी आजोबांनी मोठा खुलासा, सांगितलं कोण आहे गर्लफ्रेंड?

Last Updated:

Ishan Kishan Grandfather On girlfriend Aditi : ईशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी बोलताना आपल्या नातवाच्या लग्नाबाबत आणि त्याच्या गर्लफ्रेंडबाबत मोकळेपणाने संवाद साधला.

Ishan Kishan Grandfather On girlfriend Aditi
Ishan Kishan Grandfather On girlfriend Aditi
Ishan Kishan girlfriend : सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ईशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत बॅटने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. जरी युएसए (USA) विरुद्ध त्याचा फॉर्म थोडा खराब राहिला असला, तरी नामिबियाविरुद्ध त्याने केवळ 24 बॉल्समध्ये झंझावाती 60 रन्सची खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या मॅचमध्येही ईशान अशाच प्रकारची तुफानी बॅटिंग करेल आणि टीम इंडियाला विजय मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे. अशातच आता ईशान किशनच्या आजोबांनी मोठा खुलासा केलाय.

आदिती नावाच्या मुलीचा उल्लेख

ईशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी 'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या नातवाच्या लग्नाबाबत आणि त्याच्या गर्लफ्रेंडबाबत मोकळेपणाने संवाद साधला. अनुराग पांडे यांनी सांगितले की, ईशानने घरी आदिती नावाच्या मुलीचा उल्लेख केला होता. आदितीने ईशानच्या एका मुलाखतीचे खूप कौतुक केले होते आणि त्याच्या आजोबांबद्दलही आदर व्यक्त केला होता. या खुलाशानंतर भारतीय सलामीवीराच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
advertisement

निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र

ईशानच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे की, तो आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे. भविष्यात तो ज्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेईल, त्याला कुटुंब पूर्ण सन्मानाने स्वीकारेल. अनुराग पांडे यांनी पुढे सांगितले की, ईशानच्या मोठ्या भावाने देखील आपल्या पसंतीने लग्न केले होते आणि कुटुंबाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे ईशानच्या बाबतीतही घरच्यांची हीच परंपरा कायम राहील, जिथे मुलांच्या आनंदाला आणि पसंतीला सर्वाधिक महत्त्व दिले जाईल.
advertisement

ईशानची गर्लफ्रेंड कोण?

आदितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आजोबांनी सांगितले की, ती ईशानची गर्लफ्रेंड असून जयपूरची राहणारी आहे. आदिती सध्या मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असून तिने 'मिस इंडिया' स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले होते. ईशान किशन सध्या वर्ल्ड कप खेळण्यात प्रचंड व्यस्त आहे, परंतु त्याच्या खाजगी आयुष्यातील या अपडेटमुळे क्रिकेट फॅन्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता ही जोडी अधिकृतपणे कधी समोर येणार, याची सर्वजण वाट पाहत आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपनंतर ईशान किशन बोहल्यावर चढणार? पाकिस्तानच्या मॅचआधी आजोबांनी मोठा खुलासा, सांगितलं कोण आहे गर्लफ्रेंड?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement