advertisement

VIDEO : 'अण्णा'च्या जावयाला आला राग,भर मैदानात केली शिविगाळ,शेवटी चिडून बाऊंन्ड्री लाईनवर निघून गेला

Last Updated:

जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा केल्या होत्या. या बदल्यात कर्नाटक दुसऱ्या डावात 293 धावा करू शकली होती.त्यानंतर पाचव्या दिवसाच्या अखेर जम्मू काश्मीर 4 विकेट गमावून 342 धावांवर नाबाद राहिली होती. त्यामुळे पहिल्या डावातील डावाच्या आघाडीवर जम्मू काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले आहे.

kl rahul mayank agarwal
kl rahul mayank agarwal
Jammu Kashmir Won Ranji Trophy : जम्मू काश्मीरने 67 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. पहिल्या डावाच्या बळावर जम्मू काश्मीरला हा विजय मिळवता आहे. जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा केल्या होत्या. या बदल्यात कर्नाटक दुसऱ्या डावात 293 धावा करू शकली होती.त्यानंतर पाचव्या दिवसाच्या अखेर जम्मू काश्मीर 4 विकेट गमावून 342 धावांवर नाबाद राहिली होती. त्यामुळे पहिल्या डावातील डावाच्या आघाडीवर जम्मू काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले आहे. दरम्यान या सामन्यात एक मजेशीर घटना देखील घडली होती. अभिनेता सुनील शेट्टीचा जावय केएल राहुलने आपल्या सहकारी खेळाडूला शिविगाळ केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राहुल स्वताच चिडून बाऊंन्ड्री लाईनवर निघून गेला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर जम्मू काश्मीरने दुसऱ्या डावातही मजबूत आघाडी घेतली होती.कारण कर्नाटकच्या बॉलर्सना विकेटच मिळत नव्हती. त्यामुळे शेवटी केएल राहुल गोलंदाजीसाठी आला होता.या गोलंदाजी दरम्यान साहिल लोत्राने पहिल्याच बॉलवर राहुलला षटकार ठोकला होता. त्यानंतर राहुलने टाकलेल्या दुसऱ्या बॉलवर साहिलच्या बॅटीला कट लागून विकेटकिपरच्या ग्लोव्हजा बॉल लागून थेट स्लिपमध्ये असलेल्या मयंक अग्रवालच्या हातात कॅच गेली होती.
advertisement
पण मयंक अग्रवालने ही कॅच ड्रॉप केली.त्यामुळे राहुल त्याच्यावर प्रचंड रागावला होता.आणि या रागा रागात राहुलने भर मैदानात मयंक अग्रवालला शिविगाळ केली होती.या शिविगाळनंतर राहुलने आपली ओव्हर पूर्ण करून स्लिपमध्ये फिल्डींगला जाणे अपेक्षित होते. पण तसे न करता तो चिडून बाऊंड्री लाईनवर फिल्डींगला निघून गेला होता.त्यामुळे स्लिपमध्ये असलेले मयंक अग्रवाल, कर्णधार देवदत्त पड्डीकल आणि करूण नायर त्याच्या या कृतीवर जोरजोरात हसत होते.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर जम्मू काश्मीरने पहिल्या डावात शुभम पुंडीरच्या 121 धावांच्या शतकीय आणि येवर हसन 88, कॅप्टन पारस डोग्रा 70, अब्दुल समद 61, कन्हैया वाधवान 70, साहिल लोत्रा 72 या धावांच्या बळावर 584 धावा केल्या होत्या.त्यानंतर कर्नाटकच्या पहिल्या डावात मयंत अग्रवालच्या 160 धावांच्या बळावर 293 धावाच करू शकली. त्यानंतर पाचव्या दिवसाच्या अखेर जम्मू काश्मीर 4 विकेट गमावून 342 धावांवर नाबाद राहिली होती. त्यामुळे पहिल्या डावातील डावाच्या आघाडीवर जम्मू काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'अण्णा'च्या जावयाला आला राग,भर मैदानात केली शिविगाळ,शेवटी चिडून बाऊंन्ड्री लाईनवर निघून गेला
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement