भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार, काळाच्या पडद्याआड, महान अंपायर डिकी बर्ड यांचं निधन
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
क्रिकेटच्या सर्वोत्तम अंपायर पैकी एक म्हणून ज्यांची गणना होते, त्या डिकी बर्ड यांचं निधन झालं आहे. 92 व्या वर्षी डिकी बर्ड यांनी अखेरचा श्वास घेतला.
लंडन : क्रिकेटच्या सर्वोत्तम अंपायर पैकी एक म्हणून ज्यांची गणना होते, त्या डिकी बर्ड यांचं निधन झालं आहे. 92 व्या वर्षी डिकी बर्ड यांनी अखेरचा श्वास घेतला. डिकी बर्ड यांनी दोन दशकांहून जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून भूमिका बजावली. डिकी बर्ड 66 टेस्ट आणि 69 वनडे सामन्यांमध्ये अंपायर होते. यामध्ये पहिल्या तीन वनडे वर्ल्ड कप फायनलचा समावेश होता.
भारताने 1983 साली पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्या सामन्यात डिकी बर्ड अंपायर होते. अमरनाथ यांच्या बॉलिंगवर डिकी बर्ड यांनी मायकल होल्डिंगला एलबीडब्ल्यू आऊट दिलं, त्याच क्षणी भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. 1996 साली डिकी बर्ड आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायर म्हणून शेवटचे उभे राहिले. याच सामन्यातून सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
advertisement
'डिकी बर्ड यांनी आंतरराष्ट्रीय अंपायर म्हणून शानदार कारकिर्द अनुभवली. खेळाच्या इतिहासातील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अंपायर म्हणून त्यांचं नाव इतिहासात नोंदवंल जाईल', असं यॉर्कशायर क्रिकेट क्लबने एका निवेदनात म्हटलं आहे.
'डिकी बर्ड यांनी त्यांच्या प्रतिष्ठित कारकिर्दीमध्ये 66 टेस्ट आणि 69 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर म्हणून भूमिका निभावली, यामध्ये तीन वर्ल्ड कप फायनलचा समावेश होता. डिकी बर्ड यांचा प्रामाणिकपणा आणि निर्विवाद शैलीमुळे खेळाडू आणि चाहत्यांनी त्यांचं कायमच कौतुक केलं.'
advertisement
'डिकी बर्ड आणि यॉर्कशायर क्रिकेट हे एकेकाळी समानार्थी शब्द होते. 2014 मध्ये त्यांना यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचं अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलं. ही भूमिकाही त्यांनी अभिमानाने आणि निष्ठेने बजावली.'
डिकी बर्ड हे इंग्लिश काउंटी यॉर्कशायर आणि लीसेस्टरशायरकडून खेळले, पण आंतरराष्ट्रीय अंपायर म्हणून त्यांनी नाव कमावलं. डिकी बर्ड यांनी 93 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी 3,314 रन केल्या. तसंच त्यांनी 2 लिस्ट ए सामनेही खेळले. 1973 साली डिकी बर्ड यांनी आंतरराष्ट्रीय अंपायर म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार, काळाच्या पडद्याआड, महान अंपायर डिकी बर्ड यांचं निधन