Kolkata : बाटल्या फेकल्या, खुर्चा मोडल्या! Messi ला पहायला गेलेल्या फॅन्सचा स्टेडियमवर राडा, नेमकं काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Lionel Messi fans Vandalism : मेस्सीच्या भोवती सेक्युरीटीचा इतका मोठा गराडा होता की मेस्सीला नीट पाहता देखील आलं नाही. त्यामुळे फॅन्स नाराज झाले.
Lionel Messi fans Vandalism at the Kolkata : जगातील स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी त्याच्या 'GOAT इंडिया टूर' वर भारतात आला. 13 डिसेंबर रोजी सकाळी हा दिग्गज खेळाडू कोलकाता येथे पोहोचताच चाहत्यांनी त्याला बघायला गर्दी केली होती. लिओनेल मेस्सी सॉल्ट लेक स्टेडियमवर फॅन्सला भेटण्यासाठी आला होता. तिथं त्याला पाहण्यासाठी लोकांनी लाखो रुपये भरून लोक पोहोचले होते. तिथं देखील मेस्सीला पाहता न आल्याने मेस्सीच्या फॅन्सने मोठा राडा घातल्याचं पहायला मिळालं.
सॉल्ट लेक स्टेडियमवर मेस्सी पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी फॅन्सने मोठी गर्दी केली. मेस्सी मेस्सी म्हणत एकच जयघोष केला. पण मेस्सीच्या भोवती सेक्युरीटीचा इतका मोठा गराडा होता की मेस्सीला नीट पाहता देखील आलं नाही. त्यामुळे फॅन्स नाराज झाले अन् तेवढ्यात मेस्सी देखील आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेला. त्यामुळे फॅन्स संतापले अन् त्यांनी स्टेडियमवर तोडफोड केली.
advertisement
#WATCH | Kolkata, West Bengal: Angry fans resort to vandalism at the Salt Lake Stadium in Kolkata, alleging poor management of the event.
Star footballer Lionel Messi has left the Salt Lake Stadium in Kolkata.
A fan of star footballer Lionel Messi said, "Absolutely terrible… pic.twitter.com/TOf2KYeFt9
— ANI (@ANI) December 13, 2025
advertisement
यानंतर मेस्सी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय क्रिकेटच्या दिग्गज सौरव गांगुली यांच्याशी भेटणार आहेत. 10 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमानंतर 1.05वाजेपर्यंत समाप्त होईल. कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेशासाठी फॅन्ससाठी ७ वाजेपासून गेट उघडले जातील. स्टेडियमच्या पाच गेट्समध्ये फॅन्ससाठी प्रवेशासाठी सिक्युरिटी चेक आणि टिकट स्कॅनिंग केले जाईल.
advertisement
दरम्यान, प्रमुख कार्यक्रमानंतर मेस्सी हैदराबादमध्ये एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात भाग घेणार आहे. येथे तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक फुटबॉल सामना होईल. त्यानंतर, मेस्सी मुंबईमध्ये जाऊन विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेईल, ज्यात एक चॅरिटी मॅच आणि फॅशन शो देखील असेल.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
December 13, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kolkata : बाटल्या फेकल्या, खुर्चा मोडल्या! Messi ला पहायला गेलेल्या फॅन्सचा स्टेडियमवर राडा, नेमकं काय घडलं?










