MLC 2025 : 9 कोटी घेऊन 'सूपरफ्लॉप' ठरला, दिल्लीचा खेळाडू भलत्याच लीगमध्ये खेळला, 231 च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एका फ्लॉप क्रिकेटपटूची आता मेजर क्रिकेट लीगमध्ये बॅट तळपली आहे. या खेळाडूने 38 बॉलमध्ये 88 धावा कुटल्या आहेत. या दरम्यान त्याने 231च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.
MLC 2025 : आयपीएलमध्ये अनेक बड्या फ्रेंजायजींनी खेळाडूंवर पैशांची बरसात करत त्यांना संघात घेतलं होतं.यापैकी काही खेळाडू मात्र आयपीएलमध्ये पुर्णत फ्लॉप ठरले होते.अशाच एका फ्लॉप क्रिकेटपटूची आता मेजर क्रिकेट लीगमध्ये बॅट तळपली आहे. या खेळाडूने 38 बॉलमध्ये 88 धावा कुटल्या आहेत. या दरम्यान त्याने 231च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.
मेजर लीग क्रिकेट 2025 च्या तिसऱ्या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स हे संघ आमने सामने आले होते. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 219 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सलामीवीर फिन अॅलनने 52 धावा केल्या तर जेक फ्रेझर मॅकगर्कने 88 धावा केल्या होत्या. जेक फ्रेझरने या खेळीत 11 षटकार आणि 2 चौकार लगावले आहेत. त्यामुळे लॉस एंजेलिस नाईट रायडर्ससमोर 220 धावांचे लक्ष्य होते.
advertisement
Jake Fraser-McGurk's 88 runs earned him the title of Stake Player of the Match today in Oakland. 🔥@stakenewsindia x @StakeIND pic.twitter.com/jP44Of6wrH
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 15, 2025
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लॉस एंजेलिस नाईट रायडर्ससाठी दोन्ही सलामीवीरांना चांगली कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या उन्मुक्त चंदने 32 चेंडूंत 53 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. चंदच्या या खेळीनंतरही त्यांच्या संघाला 32 धावांनी सामना गमवावा लागला.
advertisement
कोण आहे दिल्लीचा खेळाडू?
दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामात 9 कोटी रुपयांना जेक फ्रेसर मॅकगर्क संघात घेतलं होतं. या हंगामात त्याने 6 सामने खेळले होते. या सामन्यात त्याने 55 धावाच केल्या.त्यामुळे जेक फ्रेसर मॅकगर्क या हंगामात फ्लॉप ठरला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 9 कोटी पाण्यात गेले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MLC 2025 : 9 कोटी घेऊन 'सूपरफ्लॉप' ठरला, दिल्लीचा खेळाडू भलत्याच लीगमध्ये खेळला, 231 च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा