Mohammed Shami : महिन्याला 4 लाख पूरत नाही का? पोटगी मागणाऱ्या शमीच्या बायकोला सुप्रीम कोर्टाचा दणका

Last Updated:

शमीची बायको हसीन जहाँने त्याच्या अडचणी वाढवल्या आहेत.हसीन जहॉने पोटगी वाढवण्याची मागणी करत मोहम्मद शमी पुन्हा सुप्रीम कोर्टात खेचले आहे.त्यामुळे शमीच्या आणखीण अडचणी वाढणार आहेत.

mohammed shami wife hasin Jahan
mohammed shami wife hasin Jahan
Mohammed Shami : टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतरही दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट मालिकेत निवड झाली नव्हती. निवड समीतीसोबत घेतलेली दुश्मनी मोहम्मद शमीला महागात पडली आहे.असे असतानाच आता शमीची बायको हसीन जहाँने त्याच्या अडचणी वाढवल्या आहेत.हसीन जहॉने पोटगी वाढवण्याची मागणी करत मोहम्मद शमी पुन्हा सुप्रीम कोर्टात खेचले आहे.त्यामुळे शमीच्या आणखीण अडचणी वाढणार आहेत.
मोहम्मद शमीची टीम इंडियात निवड होत नसताना तिकडे त्याची पत्नी हसीन जहाँ 4 लाख रुपयांऐवजी 10 लाख रुपयांची पोटगीची मागणी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही आदेश दिलेला नाही, परंतु हसीन जहाँच्या वकिलांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हसीन जहाँच्या वकिलांना प्रश्न विचारला की, पीडितेसाठी दरमहा 4 लाख रुपये पुरेसे नाहीत का? या प्रकरणातील पुढील सुनावणीपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे.त्यामुळे शमीच्या अडचणी वाढल्या आहे.
advertisement
शमी किती पोटगी देतो?
कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि त्यांच्या मुलीला दरमहा 4 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने शमीला हसीन जहाँला दरमहा 1,50,000 रुपये आणि त्यांच्या मुलीला दरमहा 2,50,000 रुपये देण्याचे आदेश दिले. हसीन जहाँने आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये ही रक्कम अपुरी असल्याचे म्हटले आहे आणि पोटगीत वाढ करण्याची मागणी केली आहे.
advertisement
दरम्यान 35 वर्षीय हा वेगवान गोलंदाज टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळत आहे. बंगालकडून खेळताना त्याने तीन सामन्यांमध्ये 15 बळी घेतले, तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शमीकडे पाठ फिरवली आहेत.त्यामुळे त्याचे पुनरागमन होऊ शकले नाही आहे.त्यात आता टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे शमी चर्चेत असताना, हसीन जहाँसोबतचा त्याचा सुरू असलेला वादही समोर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohammed Shami : महिन्याला 4 लाख पूरत नाही का? पोटगी मागणाऱ्या शमीच्या बायकोला सुप्रीम कोर्टाचा दणका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement