'वानखेडे'च्या मॅचची तिकीटं ब्लॅकने विकली... मुंबईच्या क्रिकेटपटूला अटक, स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडले 7 जण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिकीटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली मुंबईच्या क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिकीटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली मुंबईच्या क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात महिन्याच्या सुरूवातीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल झाली होती. या सेमी फायनलमध्ये तिकीटांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच प्रकरणी मुंबईच्या अंडर-19 टीमचा माजी क्रिकेटपटू बलवंत सिंग स्वरूप सिंग सोढा याला डीबी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
सोढा सातवा आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 वर्षांचा सोढा हा या प्रकरणातील सातवा आरोपी आहे. या प्रकरणामुळे मॅचची तिकीटं चढ्या भावाने बेकायदेशीरपणे विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे हे तपासण्यासाठी पोलिसांनी सोढा याचा मोबाईल फोन जप्त केला आहे. मोबाईलच्या माध्यमातून सोढा नेमका कुणासोबत संपर्कात होता? याचा तपास केला जाणार आहे.
advertisement
सोढाने प्रत्येकी 25 हजार रुपयांना दोन तिकीटे विकल्याचा आरोप होत आहे. मात्र त्याने ही तिकीटे कशी मिळवली, हे अद्याप उघड झालेले नाही. 'या रॅकेटमधील आणखी आरोपी शोधण्यासाठी आम्ही सोढाचा कॉल डेटा रेकॉर्ड तपासत आहोत', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी केलं स्टिंग ऑपरेशन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलची तिकीटे एक व्यक्ती अवाजवी दरात विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि खरेदीदार असल्याचं भासवलं. यानंतर विले पार्ले येथील एका कॉफी शॉपमधून आदित्य रावराणे याला अटक करण्यात आली, जेव्हा तो दोन तिकीटे प्रत्येकी 25 हजार रुपयांना विकायला तयार झाला.
advertisement
चौकशीदरम्यान रावराणे याने आपल्याला ही तिकीटे सिद्धार्थ सभापतीकडून मिळाल्याचं मिळाल्याचं सांगितलं, यानंतर पोलिसांनी रावराणेला अतिरिक्त तिकीटांसाठी सभापतीसोबत संपर्क साधायला सांगण्यात आलं. सभापतीने यासाठी मेघन संदेश प्रधान नावाच्या दुसऱ्या साथीदारामार्फत आणखी दोन तिकीटे पाठवली, त्यालाही नंतर तिथूनच अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण चार तिकीटे जप्त केली.
पोलिसांचं एमसीएला पत्र
advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेली मोफत आणि अनुदानित तिकीटे अवाजवी दरात पुन्हा विकण्याच्या कटात आरोपींचा सहभाग होता, असं पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी 24 तिकीटे जप्त केली असून तिकीटांच्या वितरणाविषयी तपशील मागवण्यासाठी असोसिएशनला पत्र लिहिलं आहे.
पोलिसांनी तिकीटाच्या काळाबाजार प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सोढाच्या अटकेपूर्वी पोलिसांनी रावराणे आणि त्याच्या साथीदारांसह 6 आरोपींना आधीच ताब्यात घेतलं होतं. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 5:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'वानखेडे'च्या मॅचची तिकीटं ब्लॅकने विकली... मुंबईच्या क्रिकेटपटूला अटक, स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडले 7 जण!









