Mumbai indians च्या प्लेअरचं करियर खराब करतोय गंभीर, धोनीच्या फेवरेटला प्रमोशन, का लागतोय आशिया कप विनरच्या बॅटला गंज?

Last Updated:

Tilak Varma Batting position : टीम इंडियाचा स्टार बॅटर तिलक वर्मा याचा आज वाढदिवस आहे. अशातच आज तरी गौतम गंभीर तिलकला त्याची बॅटिंग ऑर्डर पुन्हा देईल, अशी अपेक्षा आहे.

Tilak Varma Batting position
Tilak Varma Batting position
Indian Cricket Team : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने अनेक प्रयोग केल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये तसेच बॉलिंगमध्ये देखील मोठे बदल केल्याचं पहायला मिळालं. गौतम गंभीर वेगवेगळे प्रयोग करून आगामी वर्ल्ड कपच्या दुष्टीकोनातून नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता गंभीरच्या प्रयोगामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं करियर खराब होताना दिसत आहे.

तिलक वर्माची बॅटिंग ऑर्डर

बर्थडे बॉय तिलक वर्मा याने आशिया कपच्या फायनलमध्ये अफलातून कामगिरी करून सर्वांची मनं जिकंली होती. अशातच आता तिलक वर्माचीच बॅटिंग ऑर्डर फिक्स नसल्याचं पहायला मिळत आहे. तिलक वर्माने टीम इंडियासाठी खेळताना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर 56.68 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या धावा त्याने 148.68 च्या अफलातून स्ट्राईक रेटने कोरल्या आहेत. पण गंभीरने तिलकला खालच्या बॅटिंग ऑर्डरवर पाठवल्याने मोठ्या समस्या निर्माण झाल्यात.
advertisement

तिलक वर्माचा स्ट्राईक रेट

जेव्हा तिलक वर्माला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं जातं, तेव्हा तिलक वर्माचा स्ट्राईक रेट कमी होतो अन् सरासरी देखील खालावते. टीम इंडियासाठी 5, 6 आणि 7 व्या क्रमांकावर खेळताना तिलक वर्माचा स्ट्राईक रेट 128.98 इतका आहे. तर त्याचा अॅव्हरेज फक्त 17.80 इतका राहिला आहे.
advertisement

सूर्यकुमार फॉर्ममध्ये कधी येणार? 

दरम्यान, सूर्यकुमार यादवने गेल्या 18 टी-ट्वेंटी इनिंग्जमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावांची एकही मोठी खेळी केलेली नाही. सूर्यकुमार यादवचे मागील T20I अर्धशतक किंवा शतक 14 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे आले होते, जिथे त्याने 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला एकही मॅचमध्ये चांगली खेळी करता आली नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai indians च्या प्लेअरचं करियर खराब करतोय गंभीर, धोनीच्या फेवरेटला प्रमोशन, का लागतोय आशिया कप विनरच्या बॅटला गंज?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement