Mumbai : चर्चा सरफराज-मुशीरची, पण भाव खाऊन गेला मुंबईचा 33 वर्षांचा Crisis Man, टीम इंडियात अजून चान्स नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
रणजी ट्रॉफीच्या 2025-26 च्या मोसमात मुंबईची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. पुदुच्चेरीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 630/5 वर इनिंग घोषित केली, त्यानंतर पुदुच्चेरीचा स्कोअर 43/4 एवढा झाला आहे.
मुंबई : रणजी ट्रॉफीच्या 2025-26 च्या मोसमात मुंबईची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. पुदुच्चेरीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 630/5 वर इनिंग घोषित केली, त्यानंतर पुदुच्चेरीचा स्कोअर 43/4 एवढा झाला आहे. मुंबईच्या दोन खेळाडूंनी या सामन्यात खणखणीत शतक ठोकलं तर चौघांनी अर्धशतक केलं. सिद्धेश लाडने 170 रनची आणि आकाश आनंदने नाबाद 107 रनची खेळी केली. याशिवाय मुशीर खानने 84, हेरवाडकरने 86, सरफराज खानने 67 रन केले. कर्णधार शार्दुल ठाकूर 32 बॉलमध्ये 56 रनवर रिटायर्ड हर्ट झाला.
मुंबईचा क्रायसिस मॅन
सिद्धेश लाड हा रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईचा क्रायसिस मॅन ठरला आहे. यंदाच्या रणजी मोसमात सिद्धेश लाड मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे, त्याने आतापर्यंत 5 सामन्यांच्या 7 इनिंगमध्ये 88.33 च्या सरासरीने 530 रन केले आहेत, ज्यामध्ये 3 शतकांचा आणि एका अर्धशतकांचा समावेश आहे.
सिद्धेश लाडचे वडील दिनेश लाड हे टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तसंच शार्दुल ठाकूरचे प्रशिक्षक आहेत. मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सिद्धेशने स्वत:चं स्थान निर्माण केलं. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा सिद्धेश लाड हा मुंबईच्या टीमसाठी क्रायसिस मॅन आहे. ठोस डिफेन्स आणि स्थिर टेम्परामेंटमुळे सिद्धेश मुंबईच्या इतर महान खेळाडूंप्रमाणेच खडूस बॅटर बनला.
advertisement
सिद्धेशला पहिली मोठी ओळख मिळाली ती टोयोटा युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीपमध्ये, या स्पर्धेत तो वेस्टर्न वुल्व्हज टीमचा कर्णधार होता. वयोगटातील क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने 2013 साली रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून पदार्पण केलं, त्यानंतर त्याने मुंबईला अनेक मॅच जिंकवून दिल्या. 2015-16 च्या रणजी फायनलमध्ये टेल एंडर्ससोबत खेळताना सिद्धेशने महत्त्वपूर्ण 88 रनची खेळी केली.
advertisement
2017-18 च्या मोसमात त्याने 7 सामन्यांमध्ये 652 रन केल्या. या मोसमात तो मुंबईचा टॉप रन स्कोरर होता. मुंबईसाठी हा मोसम निराशाजनक ठरला तरी सिद्धेशच्या कामगिरीचं मात्र कौतुक झालं. दुलीप ट्रॉफीमध्येही सिद्धेश लाडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. 2015 साली त्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून टीममध्ये संधी मिळाली, पण स्वत:ची डिफेन्सिव्ह छाप बदलता न आल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान मिळू शकले नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 7:18 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai : चर्चा सरफराज-मुशीरची, पण भाव खाऊन गेला मुंबईचा 33 वर्षांचा Crisis Man, टीम इंडियात अजून चान्स नाही!


