ऑफिस रोमान्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, का वाढतोय हा ट्रेंड? प्रोफेशनल-पर्सनल लाइफमध्ये संतुलन कसं राखाल?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा भावनिक जवळीक तयार होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच ऑफिस रोमांस हा आता काही दुर्मिळ प्रकार राहिलेला नाही; उलट त्याचा स्वीकार लोकांमध्ये वाढताना दिसतो आहे.
आजच्या बदलत्या कार्यसंस्कृतीत, ऑफिस म्हणजे केवळ कामाचं ठिकाण राहिलेलं नाही. लोक दिवसातील जास्तीत जास्त वेळ सहकर्म्यांसोबत घालवतात, एकत्र काम करतात, प्रोजेक्ट्स शेअर करतात, ताणतणावाला सामोरे जातात आणि या सगळ्यातून अनेकदा भावनिक जवळीक तयार होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच ऑफिस रोमांस हा आता काही दुर्मिळ प्रकार राहिलेला नाही; उलट त्याचा स्वीकार लोकांमध्ये वाढताना दिसतो आहे.
advertisement
अलीकडील जागतिक सर्व्हेनुसार, भारत ऑफिस रोमांसच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर मेक्सिको आहे, पण भारतही फार मागे नाही. Ashley Madison आणि YouGov यांनी जाहीर केलेल्या अहवालात सांगितले आहे की सुमारे 40% भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकर्म्याला डेट केले आहे किंवा सध्या रिलेशनमध्ये आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की ऑफिस रोमांस आता अफवा नसून अनेक ठिकाणी वास्तव बनला आहे.
advertisement
सर्व्हेने आणखी एक गोष्ट उघड केली. पुरुष कर्मचारी सहकर्म्यांसोबतच्या नात्याबद्दल जास्त खुल्या पद्धतीने बोलतात, तर युवा कर्मचारी करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून थोडे जपून पावले टाकताना दिसतात. एक्स्पर्ट्सचे म्हणणे आहे की भारतात नातेसंबंधांबद्दलची विचारसरणी झपाट्याने बदलत आहे आणि लोक आधुनिक नात्यांना पूर्वीपेक्षा जास्त स्वीकारत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


