'माझं शरीर बदललं पण स्वप्न अजून...', टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच अनाया बांगरने सुरू केला सराव, RCB शी कनेक्शन काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Anaya Bangar Viral Video : अनायाच्या हातात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) या IPL चॅम्पियन संघाचा ऑफिशियल किट बॅग दिसत आहे. यामुळेच अनाया आगामी वूमन प्रीमियर लीग खेळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Anaya Bangar Viral Video in RCB KIT : भारतीय महिला क्रिकेट टीमने वनडे वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकल्यामुळे महिला क्रिकेटपटूंचा उत्साह वाढला आहे. याच उत्साहामुळे भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक मुलींना प्रेरणा मिळाली आहे, ज्यात भारताचे माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची कन्या अनाया बांगर हिचाही समावेश आहे. अनायाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्या पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरत असल्याचं दिसत आहे.
वुमेन्स प्रिमियर लीग खेळणार?
या व्हिडिओमधील विशेष गोष्ट म्हणजे, अनायाच्या हातात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) या IPL चॅम्पियन संघाचा ऑफिशियल किट बॅग दिसत आहे. यामुळेच अनाया आगामी वूमन प्रीमियर लीग (WPL 2026) मध्ये आरसीबीच्या महिला टीमकडून खेळताना दिसू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता ती येत्या काळात वुमेन्स प्रिमियर लीग खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
अनायाची जेंडर चेंज सर्जरी
अनाया बांगर हिने गेल्या वर्षी लंडनमध्ये जेंडर चेंज सर्जरी करून मुलाकडून मुलगी म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. याआधी त्या आर्यन बांगर या नावाने ओळखली जात होती आणि तिने मुंबईच्या अंडर-16 टीमकडून नॅशनल लेवलवर क्रिकेट खेळलं आहे. त्यावेळी ती यशस्वी जयस्वालसह अनेक सध्याच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या टीममेट होत्या. लिंग बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनाया सातत्याने भारतीय महिला टीमकडून खेळण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आता त्यांच्या या नव्या व्हिडिओमुळे त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी त्या गंभीर असल्याचे स्पष्ट झालं आहे.
advertisement
आरसीबीची किट बॅग घेऊन ग्राउंडवर
अनाया बांगरने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्या आरसीबीची किट बॅग घेऊन क्रिकेट ग्राउंडवर जाताना दिसत आहेत. मैदानावर रनिंग आणि वॉर्म-अप एक्सरसाइज केल्यानंतर, त्या स्ट्रेचिंग करतात आणि नंतर नेट्सवर बॅटिंग करण्यासाठी पॅड घालून तयारी करताना दिसत आहेत. यापूर्वी त्या फक्त घरगुती किंवा इंडोर सराव करतानाचे व्हिडिओ शेअर करत असत. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांनी क्रिकेट ग्राउंडवर सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्या महिला क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'माझं शरीर बदललं पण स्वप्न अजून...', टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच अनाया बांगरने सुरू केला सराव, RCB शी कनेक्शन काय?


