advertisement

India vs Namibia : ना ईशान ना पांड्या! नामीबियाच्या कॅप्टनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर? सांगितलं मॅचचा खरा टर्निंग पाईंट

Last Updated:

Namibia captain Gerhard Erasmus blame : मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने पॉवरप्लेमध्ये 57 रन्स बनवले होते, पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने 2 ओव्हर्समध्ये केवळ 7 रन्स देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

Namibia captain Gerhard Erasmus blame
Namibia captain Gerhard Erasmus blame
India vs Namibia, Gerhard Erasmus : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना नामीबियाविरुद्ध झाला होता. टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील 18 व्या मॅचमध्ये टीम इंडियाने नामिबियावर 93 रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर बोलताना नामिबियाचा कॅप्टन गेरहार्ड इरास्मस याने पराभवाचे मुख्य कारण स्पष्ट केलं. त्याने सांगितलं की, पहिल्या 6 ओव्हर्सच्या पॉवरप्लेमध्ये आमची स्थिती चांगली होती, पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगने आमच्या डावाची कंबरच तोडली. त्यावेळी त्याने पराभवाचं खरं कारण सांगितलं अन् टीम इंडियाच्या खेळाडूंवर पराभवाचं खापर फोडलं.

20 ओव्हर्समध्ये 209 रन्सचा डोंगर

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये भारताने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 209 रन्सचा डोंगर उभा केला होता. भारताकडून इशान किशनने 61 आणि हार्दिक पंड्याने 52 रन्सची तुफानी खेळी केली. नामिबियाकडून स्वतः इरास्मसने 20 रन्स देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने पॉवरप्लेमध्ये 57 रन्स बनवले होते, पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने 2 ओव्हर्समध्ये केवळ 7 रन्स देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
advertisement

कुणावर फोडलं पराभवाचं खापर

इरास्मसने मॅच संपल्यानंतर सांगितले की, पॉवरप्लेनंतर मला वाटलं होतं की दव पडल्यामुळे स्पिनर्सना बॉल पकडणे कठीण जाईल आणि आम्हाला संधी मिळेल. 26 ओव्हर्सच्या खेळानंतर आम्ही मॅचमध्ये होतो, पण वरुणच्या त्या स्पेलने आमचा पूर्ण गेम खराब केला. 6 ते 10 ओव्हर्सच्या दरम्यान आमचे बॅक बोन तुटले आणि तिथून सावरणे कठीण झाले, असं म्हणत त्याने वरुण चक्रवर्तीवर पराभवाचं खापर फोडलं.
advertisement

टीममध्ये स्पेशलायझेशनची गरज

नामिबियाच्या डेथ ओव्हर्समधील बॉलिंगबद्दल इरास्मसने जेजे स्मितचे कौतुक केलं. तो म्हणाला की, सुरुवातीला काही रन्स लीक झाले असले तरी स्मितने शेवटी ज्या पद्धतीने बॉलिंग केली, ती कौतुकास्पद आहे. आम्हाला आमच्या टीममध्ये अशाच स्पेशलायझेशनची गरज आहे. मोठ्या टीम्सविरुद्ध खेळताना आम्हाला डावाची सुरुवात आणि शेवट अधिक चांगल्या दर्जाचा करावा लागेल, असंही तो म्हणाला.
advertisement

आमच्या बॅटिंगमध्ये ताकद

दरम्यान, आमच्या बॅटिंगमध्ये ताकद आहे, पण आम्हाला सुरुवातीला थोडा वेळ खेळून पाया भक्कम करण्याची गरज आहे. चेन्नईची परिस्थिती आम्हाला अनुकूल ठरू शकते आणि अजूनही स्पर्धेत खूप काही साध्य करणं बाकी आहे, असं म्हणत त्याने आगामी मॅचमध्ये विजयाची आशा व्यक्त केलीय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India vs Namibia : ना ईशान ना पांड्या! नामीबियाच्या कॅप्टनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर? सांगितलं मॅचचा खरा टर्निंग पाईंट
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement