advertisement

Vijaya Ekadashi Vrat Katha: आजच्या विजया एकादशी व्रत कथा; प्रत्येक कार्यात विजयी होण्याची प्रेरणा

Last Updated:

Vijaya Ekadashi Vrat 2026: एकेकाळी नारद मुनींनी ब्रह्मादेवांना या एकादशीबद्दल विचारले होते. तेव्हा ब्रह्मादेव म्हणाले की हे नारद, ही एकादशी जुन्या आणि नवीन अशा सर्व पापांचा नाश करणारी आहे. त्रेतायुगात जेव्हा प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्यासह वनवासात होते, तेव्हा

News18
News18
मुंबई : मराठी पंचागानुसार आज विजया एकादशी आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते आणि व्रत कथेचे वाचन केले जाते. ही कथा केवळ धार्मिक महत्त्वाची नसून ती आत्मसंयम आणि आत्मशुद्धीची प्रेरणा मानली जाते.
विजया एकादशी व्रत कथा -
धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की हे जनार्दना, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आणि तिची विधी काय आहे ते कृपया मला सांगा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की हे राजा, या एकादशीचे नाव विजया एकादशी असं आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. भयंकर शत्रूंनी वेढलेले असताना किंवा पराजय समोर दिसत असताना ही एकादशी विजयाचे दरवाजे उघडते.
advertisement
ब्रह्मादेवांनी नारद मुनींना सांगितलेली कथा - एकेकाळी नारद मुनींनी ब्रह्मादेवांना या एकादशीबद्दल विचारले होते. तेव्हा ब्रह्मादेव म्हणाले की हे नारद, ही एकादशी जुन्या आणि नवीन अशा सर्व पापांचा नाश करणारी आहे. त्रेतायुगात जेव्हा प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्यासह वनवासात होते, तेव्हा रावणाने सीता मातेचे हरण केले. या दुखावेगाने व्याकुळ झालेले राम-लक्ष्मण माता सीतेचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता त्यांची सुग्रीवाशी मैत्री झाली आणि हनुमानाने लंकेत जाऊन सीता मातेचा शोध लावला. जेव्हा श्रीराम वानरसेनेसह लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले, तेव्हा अथांग समुद्र पाहून ते चिंतेत पडले की ही सेना समुद्र पार कशी करणार.
advertisement
ऋषी वकदाल्भ्य यांचा सल्ला - तेव्हा लक्ष्मण म्हणाले की येथून जवळच कुमारी द्वीपामध्ये वकदाल्भ्य नावाचे ऋषी राहतात, तुम्ही त्यांना यावर उपाय विचारावा. प्रभू श्रीराम ऋषींकडे गेले आणि आपली समस्या मांडली. ऋषी वकदाल्भ्य म्हणाले की हे रामा, फाल्गुन कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे उत्तम व्रत केल्यास तुमचा विजय निश्चित होईल आणि तुम्ही समुद्रही पार कराल.
advertisement
व्रताची विधी - ऋषींनी सांगितलेली विधी अशी होती की दशमीच्या दिवशी सोने, चांदी, तांबे किंवा मातीचा एक कलश तयार करावा. तो कलश पाण्याने भरून त्यावर पाच पल्लव ठेवावेत आणि वेदीवर त्याची स्थापना करावी. कलशाच्या खाली सात धान्ये आणि वरती जव ठेवावेत. त्यावर भगवान नारायणाची सुवर्णमूर्ती स्थापित करावी. एकादशीच्या दिवशी स्नान करून धूप, दीप, नैवेद्य आणि नारळाने देवाची पूजा करावी. संपूर्ण दिवस आणि रात्र कलशासमोर बसून जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी नित्यकर्मे उरकून तो कलश आणि मूर्ती एखाद्या ब्राह्मणाला दान करावी.
advertisement
प्रभू श्रीरामांनी आपल्या सेनापतींसह हे व्रत विधीपूर्वक पूर्ण केले आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांनी राक्षसांवर विजय मिळवला. ब्रह्मादेव नारद मुनींना सांगतात की जो कोणी ही कथा वाचतो किंवा ऐकतो, त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळते आणि दोन्ही लोकांत त्याचा विजय होतो.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vijaya Ekadashi Vrat Katha: आजच्या विजया एकादशी व्रत कथा; प्रत्येक कार्यात विजयी होण्याची प्रेरणा
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement