advertisement

Pakistan Playing XI : सगळे उस्मान तारिक करत राहिले, पण बुमराहचा दुश्मन ठरणार डोकेदुखी! कशी असेल पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन?

Last Updated:

Pakistan Playing XI Against India : साहिबजादा फरहान याने जसप्रीत बुमराहला सिक्स मारून आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

Pakistan Playing XI Against India Not Usman Tariq
Pakistan Playing XI Against India Not Usman Tariq
Pakistan vs India, T20 WC : टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एकमेकांसमोर असणार आहेत, तर टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल. मात्र, कोलंबोमध्ये पावसाची शक्यता असल्याने दोन्ही संघाचा गेम प्लॅन फिसकटला जाऊ शकतो. टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेच्या खेळपट्टीवर उस्मान तारिकची गोलंदाजी असेल. परंतू टीम इंडियाला बुमराहचा दुश्मन टेन्शन देऊ शकतो.

साहिबजादा फरहान ठरणार डोकेदुखी?

सईम अयूब आणि साहिबजादा फरहान या दोन सलामीवीरांकडे पाकिस्तानच्या ओपनिंगची जबाबदारी असणार आहे. साहिबजादा फरहान याने जसप्रीत बुमराहला सिक्स मारून आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तर कॅप्टन सलमान अली आगा आणि बाबर आझम हे दोन्ही फुसके खेळाडू पाकिस्तानची मिडल ऑर्डर सांभाळतील.
advertisement

उस्मान तारिक बॉलिंगला पर्याय काय?

मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ आणि उस्मान खान हे चारही पाकिस्तानी खेळाडू सध्या फॉर्ममध्ये असल्याने टीम इंडियाच्या स्पिनर्सला यांना फिरकीच्या जाळ्यात अडकवाव लागेल. तर शाहीन शाह अफरीदी, अबरार अहमद, उस्मान तारिक या बॉलर्सच्या ओव्हर टीम इंडियाला सावधरित्या खेळावं लागेल.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन (Pakistan Team Playing XI) 

advertisement
सईम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कप्तान), बाबर आजम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन शाह अफरीदी, अबरार अहमद, उस्मान तारिक.

हेड टू हेड

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेले, त्यापैकी 7 मध्ये भारताला तर केवळ 1 मध्ये पाकिस्तानला विजय मिळाला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारतच पुढे आहे. दोघांनी एकूण 16 टी-20 सामने खेळले, त्यापैकी 13 मध्ये भारताला तर फक्त 3 मध्ये पाकिस्तानला विजय मिळाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Playing XI : सगळे उस्मान तारिक करत राहिले, पण बुमराहचा दुश्मन ठरणार डोकेदुखी! कशी असेल पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement