advertisement

पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर 'बहिष्कार', T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच नवा राडा!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप सुरू असतानाच पाकिस्तानी क्रिकेटपटूंवरून नवा ड्रामा सुरू झाला आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर आणखी एका स्पर्धेत बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर 'बहिष्कार', T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच नवा राडा!
पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर 'बहिष्कार', T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच नवा राडा!
मुंबई : आयपीएल मालकीच्या टीम 'द हंड्रेड'च्या पुढच्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावातून पाकिस्तानी खेळाडूंना वगळू शकतात, असं वृत्त समोर आलं आहे. आयपीएलमधल्या मुंबई, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या फ्रँचायजींनी द हंड्रेडमधल्या टीमही विकत घेतल्या आहेत, त्यानंतर या फ्रँचायजी इंग्लंडच्या द हंड्रेडच्या लिलावात पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावणार नसल्याची काही वृत्त प्रसिद्ध झाली. यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याने इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ला यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सध्या जास्त ताणले गेले आहेत, ज्याचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावरही दिसत आहे, त्यातच आयपीएल फ्रँचायजी जगभरातल्या लीगमध्ये टीम विकत घेत आहेत, त्यामुळे या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
द हंड्रेडमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाबाबत सस्पेन्स निर्माण झालेला असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन समोर आला आहे. 'ईसीबीने यावर जलद कारवाई करण्याची गरज आहे. लीग त्यांच्या मालकीची आहे आणि त्यांनी हे होऊ देऊ नये. हा देशातला सगळ्यात सर्वसमावेशक खेळ आहे, त्यामुळे हे होऊ देता कामा नये', अशी पोस्ट मायकल वॉनने केली आहे.
advertisement
पाकिस्तानी क्रिकेटपटू यापूर्वी द हंड्रेडमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय खेळले आहेत. इमाद वसीम गेल्या मोसमात नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळला होता, ज्याचे नाव आता सनरायझर्स लीड्स असे ठेवण्यात आले आहे. मोहम्मद अमीर, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान आणि हरिस रौफ सारख्या इतर पाकिस्तानी खेळाडूंनीही मागील मोसमांमध्ये भाग घेतला आहे.
दरम्यान इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी रिचर्ड गोल्ड यांनी ईसीबी सर्वसमावेशकतेच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सर्व देशातील खेळाडूंची निवड होईल, असा आमचा विश्वास आहे, असं स्पष्टीकरण दिलं होतं.
advertisement

63 पाकिस्तानी खेळाडूंची नोंदणी

द हंड्रेडच्या 2026 च्या मोसमासाठी एकूण 63 पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं आहे. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा, शाहिन आफ्रिदी, सॅम अयुब आणि उस्मान तारीक यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, पण किती खेळाडू द हंड्रेडमध्ये सहभागी होतात? यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानची टीम वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. द हंड्रेडच्या मागच्या मोसमात मोहम्मद आमिर आणि मोहम्मद वसीम हे दोनच खेळाडू सहभागी झाले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर 'बहिष्कार', T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच नवा राडा!
Next Article
advertisement
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा;  36 नव्हे आता 3 तासांत कारवाई, सरकारच्या नोटिफिकेशनने देशभरात चर्चा
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा; 36 नव्हे आता 3 तासांत कारवाई
  • आजपासून नवे नियम लागू

  • सरकारचा मोठा निर्णय

  • नियम पाळले नाहीत तर होणार थेट कारवाई

View All
advertisement