आर. अश्विनने रचला इतिहास, 'कॅरम बॉल'ने टी20मध्ये पुन्हा धुमाकूळ घालणार, 'या' फ्रेंचायजीने घेतलं ताफ्यात
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आर.अश्विनने मोठा निर्णय घेतला आहे. आर.अश्विन आता टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
R Ashwin Major League Cricket : टीम इंडियाची माजी स्पिनर गोलंदाज आर. अश्विनने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. विशेष म्हणजे आर.अश्विनने आयपीएलमधून देखील निवृत्ती जाहीर केली होती. या निवृत्तीनंतर आर.अश्विन युट्यूबच्या माध्यमातून फॅन्सशी जोडला गेला होता. पण आता तो पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे अश्विन पुन्हा एकदा आपल्या कॅरम बॉलने टी20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणार आहे. दरम्यान आर. अश्विन नेमक्या कोणत्या टी20 लीगमध्ये खेळणार आहे? त्याला कोणत्या फ्रेंचायजीने ताफ्यात घेतलं आहे? त्यासोबत त्याने इतिहास काय रचला आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आर. अश्विन हा मेजर लीग क्रिकेटध्ये खेळताना दिसणार आहे.कारण सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघासोबत तो करारबद्ध झाला आहे. अशी घोषणाच सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने केली आहे. त्यामुळे आता आर अश्विन अमेरिकन टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. पण अशाप्रकारे दुसऱ्या टी20 लीगमध्ये खेळणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरणार आहे.त्यामुळे त्याने हा वेगळा विक्रम केला आहे.
advertisement
Class, control, and spin.
Ravichandran Ashwin is a Unicorn 🦄✨ Who guessed it?
Read more ➡️ https://t.co/UrEThI0HR7#SFUnicorns #GoCorns @ashwinravi99 pic.twitter.com/06WUpzvdwy
— San Francisco Unicorns (@SFOUnicorns) March 28, 2026
advertisement
“एमएलसीने गेल्या काही हंगामांमध्ये जागतिक दर्जाचे खेळाडू आणून आणि अमेरिकेतील देशांतर्गत क्रिकेट प्रतिभेला महत्त्वपूर्ण संधी देऊन एक उत्तम कार्यक्रम सादर करण्याची क्षमता सिद्ध केली आहे, आणि सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत याचा भाग होण्याची संधी मी सोडू शकलो नाही, असे आर अश्विन म्हणाला आहे.
“मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून ही जबाबदारी स्वीकारणे, ही एक मोठी जबाबदारी आहे जी मी पूर्णपणे स्वीकारतो.” “या फ्रँचायझीला सामने जिंकण्यास आणि पहिल्या चॅम्पियनशिपसाठी प्रयत्न करण्यास मदत करणे, तसेच बे एरियाच्या चाहत्यांसाठी शानदार क्रिकेट सादर करणे, यावरच माझे पूर्ण लक्ष आहे,” असे अश्विनने एका निवेदनात म्हटले आहे.
advertisement
दरम्यान युनिकॉर्न्स संघात हॅरिस रौफ, फिन ॲलन आणि मॅथ्यू शॉर्ट यांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या भक्कम यादीत अश्विन सामील झाला आहे.
39 वर्षीय आर अश्विनने 333 टी20 सामने खेळले असून त्यात केवळ 7.11 च्या इकॉनॉमीने 317 बळी घेतले आहेत.त्यामुळे त्याच्या या अनुभवाचा फायदा टीमला होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आर. अश्विनने रचला इतिहास, 'कॅरम बॉल'ने टी20मध्ये पुन्हा धुमाकूळ घालणार, 'या' फ्रेंचायजीने घेतलं ताफ्यात









