advertisement

IPL : संजूसाठी ऋतुराज गायकवाडचा बळी! जडेजाही संकटात, CSK-राजस्थानच्या डीलमध्ये नवा ट्विस्ट!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

संजूसाठी ऋतुराज गायकवाडचा बळी! जडेजाही संकटात, CSK-राजस्थानच्या डीलमध्ये नवा ट्विस्ट!
संजूसाठी ऋतुराज गायकवाडचा बळी! जडेजाही संकटात, CSK-राजस्थानच्या डीलमध्ये नवा ट्विस्ट!
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. स्वत: संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटकडे त्याला रिलीज करण्याची किंवा ट्रेड करण्याची मागणी केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं, यानंतर आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपरकिंग्स संजू सॅमसनला त्यांच्या टीममध्ये सामील करण्यासाठी उत्सुक आहे. त्यातच आता राजस्थान रॉयल्सने सीएसके कडे संपर्क केला आहे आणि संजू सॅमसनच्या बदल्यात एका खेळाडूची मागणी केली आहे.

राजस्थानने ठेवली अट

राजस्थान रॉयल्सने सीएसकेकडे संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यापैकी एका खेळाडूला त्यांना देण्याची मागणी केली आहे, पण सीएसकेने याबद्दल राजस्थान रॉयल्सना अजून उत्तर दिलेलं नाही, असं वृत्त समोर आलं आहे.
आयपीएल लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत ट्रेड विंडो खुली असते, त्यामुळे दोन्ही फ्रॅन्चायजी एक तर कॅश डील किंवा खेळाडू अदलाबदली करण्यावर सहमत होतात. संजू सॅमसनने साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने अनेक फ्रॅन्चायजींना संपर्क केला आहे, पण यात सीएसके संजूसाठी जास्त आग्रही आहे.
advertisement
सीएसकेशिवाय केकेआरलाही संजू सॅमसनला टीममध्ये घेण्याची इच्छा आहे, पण स्वत: संजूला सीएसकेकडून खेळायचं आहे. आयपीएल संपल्यानंतर संजूने अमेरिकेत जाऊन सीएसके मॅनेजमेंट आणि त्यांचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याचीही भेट घेतल्याचं वृत्त आहे. संजू सॅमसन हवा असेल तर ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्यापैकी एक खेळाडू द्यायची अट राजस्थानने सीएसके समोर ठेवली आहे. आता सीएसके राजस्थानची ही मागणी मान्य करणार का? यावरच ही डील फायनल होणार का याचा निर्णय होईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL : संजूसाठी ऋतुराज गायकवाडचा बळी! जडेजाही संकटात, CSK-राजस्थानच्या डीलमध्ये नवा ट्विस्ट!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement