Rinku Singh च्या Engagement ला चमचमीत पदार्थ, भारतीय पदार्थांचीही रेलचेल, मेन्यू कार्ड वाचून तोंडाला सुटेल पाणी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rinku Singh Engagement Menu Card : क्रिकेटर रिंकु सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांच्या एन्गेजमेंट सेरेमनीसाठी खास मेन्यू ठेवण्यात आलाय. नेमकं काय काय? पाहा
Rinku Singh Priya Saroj Engagement : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकु सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा समारंभ पार पडतोय. साखरपुड्यासाठी सेंट्रम हॉटेलचा फुलकर्न हॉल निवडण्यात आला आहे. अशातच आता रिंकु आणि प्रिया सरोज यांच्या रिंग सेरेमनीमध्ये खास मेन्यू ठेवण्यात आले आहेत. मेन्यू कार्डमध्ये काय काय? जाणून घ्या
तब्बल 6 हजार रुपयाची एक थाळी
लखनऊच्या ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा होणार आहे, त्या हॉटेलमध्ये जेवणाची किंमत खूप जास्त आहे. फक्त साखरपुड्यावर रिंकु सिंगने लाखोंचा खर्च केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका थाळीची सर्वात कमी किंमत 6 हजार रुपये इतकी आहे.
advertisement
मेन्यूमध्ये काय काय?
रिंकु सिंगच्या साखरपुड्याला मेन्यूमध्ये मिक्स व्हेज रायता आणि पाइन ॲपल रायता यांसारख्या रायत्यांच्या प्रकारांचा समावेश होता, तर दही भल्ला आणि पापड हे स्टार्टर्स म्हणून दिले होते. मुख्य पदार्थांमध्ये पनीर टिक्का लबाबदार, भेंडी मसाला आणि लसूणी मकई पालक यांसारख्या भाज्या होत्या, तर चायनीज पदार्थांमध्ये व्हेज मंचुरियन आणि व्हेज हक्का नुडल्स यांचा समावेश होता. गोड पदार्थांचीही उत्तम सोय केली होती.
advertisement
जेवण लय भारी
गोडमध्ये, इमरती-रबडी, वॉलनट ब्राऊनी, व्हॅनिला आईस्क्रीम विथ चॉकलेट सॉस, मूंग दाल हलवा, शाही तुकडा आणि कुकीज असे अनेक पर्याय होते. याव्यतिरिक्त, दम आलू बिर्याणी, जीरा राईस, दाल लखनवी आणि शाही तडका दाल हे भात आणि डाळीचे प्रकार उपलब्ध होते. सोबत कढी पकोडा, विविध प्रकारच्या भारतीय ब्रेड्स (असॉर्टेड इंडियन ब्रेड) आणि पेय म्हणून चाय आणि कॉफी यांचीही व्यवस्था केली होती, ज्यामुळे पाहुण्यांना विविध चवींचा अनुभव घेता येईल.
advertisement
वडील तूफानी सरोज म्हणाले...
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पियुष चावला आणि उत्तर प्रदेश रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयाल हॉटेलमध्ये पोहोचले. प्रिया सरोज यांचे आमदार वडील तूफानी सरोज हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी माध्यमांना सांगितले की, मी खूप आनंदी आहे. सर्व पाहुण्यांसाठी समान व्यवस्था करण्यात आली आहे. विधीनुसार मंत्रोच्चार करून अंगठी विधी पार पडेल. शेवटी, रिंकू सिंग आणि प्रिया सरोज एकमेकांच्या बोटात अंगठी घालतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 08, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh च्या Engagement ला चमचमीत पदार्थ, भारतीय पदार्थांचीही रेलचेल, मेन्यू कार्ड वाचून तोंडाला सुटेल पाणी!