अर्रर्र! रियान परागची यूट्यूब सर्च हिस्ट्री व्हायरल, शोधत होता सारा अली खान हॉट...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रियान पराग यूट्यूबवर काय सर्च करतो हे त्यामध्ये दिसतंय. सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे आहेत.
दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू रियान परागचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रियान पराग त्याच्या यूट्यूब सर्च हिस्ट्री दाखवत असल्याच्या या व्हिडीओनंतर त्याच्यावर टीका होत आहे. रियान पराग यूट्यूबवर काय सर्च करतो हे त्यामध्ये दिसतंय. सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे आहेत. त्यातही रियान परागने दोन्ही अभिनेत्रींची नावे सर्च करताना त्यांच्या नावानंतर हॉट असा शब्द टाकून सर्च केलंय.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये रियान पराग युट्यूबवर काही सर्च करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सर्चमध्ये त्याने आधी शोधलेल्या गोष्टी सजेस्ट होत होत्या. त्यात अनन्या पांडे हॉट, सारा अली खान हॉट, विराट कोहली असं सर्च केल्याचं दिसतं.
Indian guy, wearing a baniyan, sweaty summer, searching actresses.
Many can relate with parag.
— ً (@KohliMyHeart) May 27, 2024
advertisement
एका ट्विटर युजरने त्याच्या पोस्टमध्ये दावा केला की रियान परागची ही खरी सर्च हिस्ट्री आहे. रियान परागची सर्च हिस्ट्री सारा अली खान हॉट, विराट कोहली, अनन्या पांडे हॉट असं युजरने पोस्ट केलं आहे.
Summary pic.twitter.com/i0T1BEJIHr
— Shivani (@Shivanistfu) May 27, 2024
advertisement
रियान परागच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. तर एका युजरने म्हटलं की, भारतीय मुलगा, बनियान घालून अभिनेत्रींबाबत शोधत आहे. अनेक लोक परागच्या भावना समजू शकतात.
रियान परागच्या या व्हिडीओवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, काहींनी त्याला ट्रोल केलं तर काहींनी इतरांच्या सर्च हिस्ट्रीमध्ये डोकावू नये असं असेही सल्ले दिले आहेत. दरम्यान, रियान परागचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा की खोटा याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 28, 2024 2:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
अर्रर्र! रियान परागची यूट्यूब सर्च हिस्ट्री व्हायरल, शोधत होता सारा अली खान हॉट...