advertisement

Rohit Sharma VIDEO : '11 वर्षांचा होतो, पण किट घ्यायची ऐपत नव्हती...', रोहितने सांगितली पहिल्या क्रिकेट किटची आठवण

Last Updated:

रोहित शर्माने त्याच्या पहिल्या किटची आठवण सांगितली आहे.ही आठवण सांगताना रोहित शर्मा भावूक झाला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

rohit sharma
rohit sharma
Rohit Sharma video : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा टी20 वर्ल्डकपचा ब्रँड अँम्बेसेडर असल्याने स्पर्धेत प्रचंड व्यस्त आहे. या दरम्यान त्याने इंग्लंडचा स्टार खेळाडू केवीन पिटरसनसोबत एक स्पर्धा खेळली आहे. या स्पर्धे दरम्यान रोहित शर्माने त्याच्या पहिल्या किटची आठवण सांगितली आहे.ही आठवण सांगताना रोहित शर्मा भावूक झाला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला आहे. हे जाणून घेऊयात.
खरं तर भारताच्या झिम्बाबे विरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने केविन पीटरसन सोबत स्विच हिट चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. हे चॅलेंज तीन पातळ्यांमध्ये विभागले गेले होते सोपे, मध्यम आणि अशक्य. दोन्ही खेळाडूंनी निश्चित लक्ष्य गाठून गुण मिळवले आणि ज्याने कमीत कमी बॉलमध्ये 250 गाठले तो विजेता ठरणार होता.
advertisement
अंतिम फेरीमध्ये केवीन पिटरसनने 250 गुणांचा टप्पा गाठला.त्याला तीन बॉलमध्ये हे करायचे होते आणि त्याने आतल्या बाजूला फटका मारून आव्हान पुर्ण केले होते.त्यावेळी रोहित शर्मा 210 गुणांवर होता आणि त्याला मागे टाकण्यासाठी फक्त दोन बॉल शिल्लक होते. रोहितने पहिल्याच प्रयत्नात संधी हुकवली होती. ज्यामुळे त्याला जिंकण्यासाठी शेवटची संधी होती. त्यात त्याने इनसाईड आऊट शॉर्ट मारला आणि आपलं चॅलेंज पूर्ण केलं. अशाप्रकारे तो 250 गुणांच्या पुढे गेला आणि त्याने चॅलेंज जिंकलं.
advertisement
या चॅलेंजनंतर पीटरसनशी बोलताना रोहित शर्माने त्याच्या पहिल्या किटचा किस्साही सांगितला होता. मी फक्त 11 वर्षाचा होतो.पण मी क्रिकेटच किट घेऊ शकत नव्हतो. पण माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला कुणातरी गिफ्ट दिलं. आणि ते माझं पहिलच किट बनलं. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही, असे रोहित शर्मा सांगताना भावूक झाला होता. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma VIDEO : '11 वर्षांचा होतो, पण किट घ्यायची ऐपत नव्हती...', रोहितने सांगितली पहिल्या क्रिकेट किटची आठवण
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement