'तुम्ही खूप मोठी लोक, कोणी हात लावू शकत नाही', कॅमेरासमोर कुणाला बोलला रोहित शर्मा? Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माबद्दल मागच्या बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
मुंबई : भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माबद्दल मागच्या बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रोहित शर्मावर आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होण्यासाठी दबाव येत असल्याचं बोललं जात होतं. यातच आता रोहित शर्माचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित त्याच्या ट्रॉली बॅगसोबत कारच्या दिशेने जात आहे, तेव्हा पॅपराझी त्याचा पाठलाग करतात. या सगळ्यांना पाहून रोहितने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
मुंबई एअरपोर्टवरून बाहेर पडत असताना काही पॅपराझी यांनी रोहितचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरूवात केली. 'तुम्ही कोण आहात?' असा प्रश्न रोहितने विचारला, त्यावर फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांनी आम्ही पॅपराझी असल्याचं सांगितलं. यावर रोहितने तुम्ही खूप मोठी लोक आहात, तुम्हाला कुणीही हात लावू शकत नाही, असं उत्तर दिलं.
advertisement
Captain Rohit Sharma back in Mumbai after clear fitness test at NCA.🔥 pic.twitter.com/1TxQPiAEUT
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'तुम्ही खूप मोठी लोक, कोणी हात लावू शकत नाही', कॅमेरासमोर कुणाला बोलला रोहित शर्मा? Video