Ruturaj Gaikwad : ऋतुराजची बॅट तळपली... आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार! एकाचा पत्ता कट होणार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मागच्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेला ओपनर ऋतुराज गायकवाड हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
मुंबई : मागच्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेला ओपनर ऋतुराज गायकवाड हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी करून ऋतुराज गायकवाडने टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी त्याचा दावा ठोकला आहे. दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या 3 मॅचच्या अनधिकृत वनडे सीरिजमध्ये ऋतुराजची बॅट तळपली आणि त्याला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार देण्यात आला.
ऋतुराज गायकवाडने सीरिजमध्ये 105 च्या सरासरीने 210 रन केल्या. ऋतुराज गायकवाड हा मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे, तसंच दुखापतींमुळेही त्याला बराच काळ क्रिकेटपासून लांब राहावं लागलं. पण दुखापतींनंतर कमबॅक करताना ऋतुराजने एक शानदार शतक आणि एक अर्धशतक झळकावले आणि मोठ्या खेळी करण्याची क्षमता त्याने दाखवून दिली. पहिल्या सामन्यात ऋतुराजने 129 बॉलमध्ये 117 रन केले, ज्यात 12 फोरचा समावेश होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 9 फोरच्या मदतीने 83 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले.
advertisement
भारताने सीरिजमधले दोन सामने जिंकले आणि दोन्ही विजयांमध्ये ऋतुराज गायकवाडने उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या कामगिरीनंतर ऋतुराजची टीम इंडियात कमबॅक व्हायची शक्यता वाढली आहे. टीमला जेव्हा गरज होती, तेव्हा ऋतुराजने पुढाकार घेतला आणि मॅच विनिंग खेळी केली. ऋतुराजने 2024 साली झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सध्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना दुखापत झाल्यामुळे ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात संधी मिळू शकते.
advertisement
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारतासाठी 6 वनडे आणि 23 टी-20 मॅच खेळल्या आहेत. ऋतुराजच्या सध्याच्या कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी तो पुन्हा एकदा इंडियाकडून खेळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 10:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ruturaj Gaikwad : ऋतुराजची बॅट तळपली... आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार! एकाचा पत्ता कट होणार


