World Cup Final : या एका फोटोमागे लपलंय टीम इंडियाच्या विजयाचं सिक्रेट, कितीही डोकं लावा उत्तर सापडणारच नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shafali Verma On Sachin Tendulkar : शेफाली वर्मा हिला जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंगच्या पर्फॉर्मन्समुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच अॅवॉर्डने गौरवण्यात आले.
Shafali Verma Statement On CWC Winning Performace : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम मॅचमध्ये युवा ओपनर शेफाली वर्माने साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना अविश्वसनीय पर्फॉर्मन्स केला आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. दुखापतीमुळे सेमीफायनल आधी टीममध्ये सामील झालेल्या शफालीने या मोठ्या संधीचा फायदा घेतला. तिने फलंदाजीत 78 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 87 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीमुळे वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम मॅचमध्ये फिफ्टी झळकावणारी ती सर्वात युवा प्लेअर ठरली. मात्र, वर्ल्ड कप फायनलआधी असं काय झालं होतं? ज्यामुळे शेफाली वर्मा थेट मॅच जिंकवून आली. यावर शेफालीने खुलासा केला आहे.
अंतिम मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच
महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेली युवा ओपनर शेफाली वर्मा हिने विजयानंतर टीममधील वरिष्ठ प्लेअर्स आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे आभार मानले. तिच्या या जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंगच्या पर्फॉर्मन्समुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच अॅवॉर्डने गौरवण्यात आले.
advertisement
...तेव्हा खूप आनंद होतो - शेफाली वर्मा
"ज्येष्ठ खेळाडूंनी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलून फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितला. 'तुझा खेळ सोडू नकोस', असा स्पष्ट संदेश टीममधील सिनियर खेळाडूंनी मला दिला. जेव्हा तुम्हाला इतकी स्पष्टता मिळते, तेव्हा खूप आनंद होतो," असे शेफालीने नमूद केलं. सेमीफायनलआधी टीममध्ये सामील झालेल्या शेफालीला या स्पष्ट गाईडन्सचा खूप फायदा झाला. तर सचिन तेंडुलकर स्टेडियममध्ये उपस्थित असल्याबद्दल बोलताना शफाली खूप भावूक झाली.
advertisement
सचिन सरांमुळे आत्मविश्वास वाढला - शेफाली वर्मा
"सचिन सर समोर असणं माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण आहे. पण जेव्हा मी सचिन सरांना पाहिले, तेव्हा मला एक वेगळाच बूस्ट मिळाला. मी त्यांच्याशी नेहमी बोलत असते आणि ते मला नेहमी आत्मविश्वास देतात. ते क्रिकेटचे लेजेंड्स आणि मास्टर्स आहेत. त्यांच्याशी बोलून मला खूप प्रेरणा मिळते. आजही त्यांना स्टेडियममध्ये पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे मला माझ्या डावावर लक्ष केंद्रित करता आलं," असं शफाली वर्माने सांगितलं.
advertisement
स्मृती मंधानासोबत शतकी पार्टनरशिप
दरम्यान, ज्यामुळे तिच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला. तिने स्मृती मंधानासोबत 104 धावांची शतकी पार्टनरशिप करून टीम इंडियाला 298 धावांचा मोठा टोटल उभारण्यास मदत केली. बॉलिंगमध्ये देखील तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वास सार्थ ठरवत 7 ओव्हरमध्ये 36 रन्स देत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup Final : या एका फोटोमागे लपलंय टीम इंडियाच्या विजयाचं सिक्रेट, कितीही डोकं लावा उत्तर सापडणारच नाही!


