'हमारी तरक्की में इंडिया रोड़ा...', Shahid Afridi ने ओकली गरळ, पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाला...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shahid Afridi Controversial statement : शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये माध्यमांशी बोलताना भारतावर जोरदार टीका केली. अशातच आता भारत पाकिस्तानच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे, असं वक्तव्य शाहीद आफ्रिकीने केलं आहे.
Shahid Afridi Victory Rally : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. सीमेवरील तणाव कमी झाल्यानंतर आता पाकिस्तानकडून शाब्दिक हल्ले सुरू झाले आहेत. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये माध्यमांशी बोलताना भारतावर जोरदार टीका केली. अशातच आता भारत पाकिस्तानच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे, असं वक्तव्य शाहीद आफ्रिकीने केलं आहे.
नेमकं काय म्हणाला शाहीद आफ्रिकी?
भारत प्रगती करत आहे आणि आम्हाला त्याच्या प्रगतीबद्दल खूप आनंद आहे. त्याचे क्रिकेट प्रगती करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपण पुढे जात असताना, आपल्याला थांबवलं जात आहे, असा आरोप पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केलाय. शेजाऱ्यांचं हे कसलं काम? असा सवाल देखील शाहिद आफ्रिदी याने विचारला.
advertisement
शाहीद आफ्रिकीची पहिली वेळ नाही...
शाहीद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी अप्रत्यक्षपणे भारतीय सैन्याला जबाबदार धरलं आणि भारतावर दहशतवादी कृत्य स्वतः घडवून पाकिस्तानवर आरोप करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याने भारतीय मीडियाच्या वृत्तांकनाला 'बॉलिवूड' म्हटलं आणि खिल्ली उडवली होती. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आफ्रिदीने या निर्णयावर टीका केली आणि काश्मिरी लोकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला होता. अनेकदा त्याने भारताविरुद्ध चिथावणीखोर आणि तथ्यहीन विधाने केली आहेत.
advertisement
शाहिद आफ्रिदीच्या चुलत भावाची हत्या भारत-पाकिस्तान सीमेवर झाली. 2003 मध्ये, बीएसएफने अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत शाहिद आफ्रिदीच्या भावाला ठार मारले. शाहिद आफ्रिदीच्या भावाचे नाव शाकिब होते. शाकिब हा हरकत-उल-अन्सारचा बटालियन कमांडर असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आफ्रिदी अनेकदा भारतावर टीका करण्याची संधी सोडत नाही.
शाहीद आफ्रिदीची कारकीर्द
शाहीद आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्याने 23.57 च्या सरासरीने 8064 धावा केल्या, ज्यात 6 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 124 आहे. गोलंदाजीमध्ये त्याने 34.51 च्या सरासरीने 395 विकेट्स घेतल्या. आफ्रिदीने 27 कसोटी सामने खेळले आणि 36.51 च्या सरासरीने 1716 धावा केल्या, ज्यात 5 शतके आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 क्रिकेटमध्ये आफ्रिदीने 99 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने 17.92 च्या सरासरीने 1416 धावा केल्या आणि 150.00 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 15, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'हमारी तरक्की में इंडिया रोड़ा...', Shahid Afridi ने ओकली गरळ, पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाला...