आशिया कपमधून डावलताच Shreyas Iyer ने मौन सोडलं! शाहरुखच्या KKR वर 'गंभीर' आरोप, कोलकाता सोडण्याचं कारण काय?

Last Updated:

Shreyas Iyer breaks silence On KKR : पंजाबमध्ये मला आता मिळणारा 'आदर' आणि सहवास केकेआरमध्ये त्याच्या कारकि‍र्दीत मिळाला नव्हता, असं श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.

Shreyas Iyer breaks silence On KKR
Shreyas Iyer breaks silence On KKR
Shreyas Iyer Alligation On Gautam Gambhir : टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल जिंकवून दिली होती. मात्र, त्याच्या पुढच्याच वर्षी श्रेयस अय्यरने केकेआरला रामराम ठोकला. अशातच आता एका मुलाखतीत श्रेयस अय्यरने कबूल केलं की, पंजाबमध्ये त्याला आता मिळणारा 'आदर' आणि सहवास केकेआरमध्ये त्याच्या कारकि‍र्दीत मिळाला नव्हता. त्यामुळे गंभीरसोबत असलेला छुपा वाद हेच श्रेयसचं केकेआर सोडण्यामागील कारण होतं, हे स्पष्ट झालं आहे.

पंजाब किंग्जमध्ये आदर मिळाला - श्रेयस अय्यर

एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून मी माझं शंभर टक्के देतो. जर मला आदर मिळाला तर कोणतीही गोष्ट मिळवणं शक्य आहे. पंजाबमध्ये हेच झालं. त्यांनी मला प्रत्येक प्रकारे पाठिंबा दिला, मग ते प्रशिक्षक असोत, व्यवस्थापन असो किंवा खेळाडू. मी व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांसोबतच्या प्रत्येक बैठकीत उपस्थित होतो आणि रणनीती आखण्यात योगदान देत होतो. मला हे खूप आवडलं, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
advertisement

केकेआरमध्ये पूर्णपणे सहभागी नव्हतो - श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर याने पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यातील ड्रेसिंग रुममधील वातावरणावर देखील भाष्य केलं. त्यावेळी त्याने मेगा लिलावासाठी केकेआरच्या योजनांबद्दल बोलताना अय्यरने मोठा खुलासा केला, मी संभाषणाचा भाग होतो पण पूर्णपणे सहभागी नव्हतो. मी जिथं आहे तिथं पोहोचण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागले आहेत, असंही श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.
advertisement

श्रेयस गंभीरच्या टार्गेटवर

दरम्यान, टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस यांच्यातील छुप संघर्ष इथूनच सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं. याच संघर्षामुळे गौतम गंभीरने श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये देखील संधी दिली नाही, हे स्पष्ट दिसून येतं होतं. अशातच आता आशिया कपमधून डावलताच श्रेयसने गंभीरला टार्गेटवर धरलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कपमधून डावलताच Shreyas Iyer ने मौन सोडलं! शाहरुखच्या KKR वर 'गंभीर' आरोप, कोलकाता सोडण्याचं कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement