क्रिकेटविश्वाला धक्का! भारताचे 4 खेळाडू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात, रियान परागशी कनेक्शन समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Syed Mushtaq Ali Trophy Assam Cricket : निलंबित करण्यात आलेल्या या खेळाडूंनी वेगवेगळ्या स्तरांवर राज्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि आता त्यांच्याविरोधात राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Syed Mushtaq Ali Trophy : कोणत्याही खेळाडू पैसा आला तर त्या खेळाला घरघर लागते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अशातच आता क्रिकेटला पुन्हा मॅच फिक्सिंगचा डाग लागला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एका राज्याच्या क्रिकेट संघात मोठी खळबळ उडाली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 दरम्यान, काही खेळाडूंनी कथित भ्रष्ट आचरणात भाग घेतल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या गंभीर आरोपानंतर राज्य क्रिकेट असोसिएशनने (Cricket Association) त्वरित आणि कठोर भूमिका घेत चार प्रमुख खेळाडूंना निलंबित केले आहे.
चार क्रिकेटर्स निलंबित
निलंबित करण्यात आलेल्या या खेळाडूंनी वेगवेगळ्या स्तरांवर राज्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि आता त्यांच्याविरोधात राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. असम क्रिकेट संघ (Assam Cricket Association - ACA) ने अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी या चार क्रिकेटर्सना निलंबित केले आहे. या खेळाडूंवर असमच्या काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, जे सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये सहभागी झाले होते. हे चारही खेळाडू रियान पराग याचे टीममेट्स आहेत.
advertisement
फौजदारी कारवाई सुरू
एसीएचे सचिव सनातन दास यांनी सांगितले की, आरोप समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटने (ACSU) चौकशी केली. एसीएने देखील फौजदारी कारवाई सुरू केली आहे. प्रथम दृष्ट्या यांच्या गंभीर गैरवर्तनात सामील होण्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे खेळाच्या अखंडतेला धक्का पोहोचतो.
चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत...
advertisement
सनातन दास यांनी पुढं स्पष्ट केलंय की, परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत किंवा असोसिएशनने पुढील कोणताही निर्णय घेईपर्यंत निलंबन कायम राहील. असमचे सैयद मुश्ताक लीग मॅचेस 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान लखनऊ येथे आयोजित करण्यात आले होते, पण संघ सध्या सुरू असलेल्या सुपर लीग फेरीत प्रवेश करू शकला नाही.
advertisement
मॅचमध्ये भाग घेण्यास मनाई
दरम्यान, निलंबन कालावधीत, या खेळाडूंना एसीए, तिच्या जिल्हा युनिट्स किंवा संबंधित क्लब्सद्वारे आयोजित कोणत्याही राज्य-स्तरीय टूर्नामेंट किंवा मॅचमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मॅच रेफरी, कोच, अम्पायर इत्यादी म्हणून कोणत्याही क्रिकेट संबंधित ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं देखील प्रतिबंधित आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 10:16 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेटविश्वाला धक्का! भारताचे 4 खेळाडू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात, रियान परागशी कनेक्शन समोर









