Weekly Rashi Bhavishya: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य; तिसरा आठवडा आनंदाचा पण..

Last Updated:
Weekly Horoscope: डिसेंबरचा तिसरा आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतो. या आठवड्यातील ग्रहांची स्थिती खास असेल, ग्रहांचा राजा सूर्य आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीत असेल आणि 16 तारखेला धनु राशीत प्रवेश करेल, तिथे मंगळ आधीच आहे. शिवाय बुध वृश्चिक राशीत आहे, गुरू मिथुन राशीत वक्री आहे आणि शुक्र वृश्चिक राशीत आहे, 20 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल. एकंदरीत ग्रहस्थितीनुसार सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ पाहा.
1/7
 सिंह रास (Leo) -सिंह राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात परिस्थिती कधी मऊ, कधी अनुकूल, तर कधी प्रतिकूल असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमची कामं वेळेवर पूर्ण झालेली दिसतील, तर उत्तरार्धात कामाशी संबंधित समस्या तुमच्या चिंतेचं मोठं कारण बनतील. सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात भावनेच्या भरात किंवा घाईगडबडीत करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका; अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. तुम्हाला कामं पुढं ढकलण्याची सवय कमी करण्याची गरज असेल.

advertisement
2/7
सिंह - आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हा काळ थोडा प्रतिकूल असू शकतो. या काळात तुम्हाला केवळ तुमच्याच नव्हे, तर तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल देखील सावध राहण्याची गरज असेल. आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष केल्यास तुम्हाला रुग्णालयात जावं लागू शकतं. कौटुंबिक सुख मध्यम राहील. सुखी वैवाहिक जीवनासाठी, तुमच्या नात्याबद्दल प्रामाणिक रहा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.शुभ रंग: नारंगी
शुभ अंक: 3
सिंह - आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हा काळ थोडा प्रतिकूल असू शकतो. या काळात तुम्हाला केवळ तुमच्याच नव्हे, तर तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल देखील सावध राहण्याची गरज असेल. आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष केल्यास तुम्हाला रुग्णालयात जावं लागू शकतं. कौटुंबिक सुख मध्यम राहील. सुखी वैवाहिक जीवनासाठी, तुमच्या नात्याबद्दल प्रामाणिक रहा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.शुभ रंग: नारंगीशुभ अंक: 3
advertisement
3/7
कन्या रास (Virgo) - कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र परिणामाचा असेल. या आठवड्यात दुखापत होण्याची किंवा चोरीची भीती आहे. काळजीपूर्वक वाहन चालवा आणि तुमच्या वस्तूंची पूर्ण काळजी घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धार्मिक आणि कौटुंबिक कामांमध्ये व्यस्त असाल. या काळात तुम्हाला अचानक लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं. आठवड्याच्या मध्यभागी काही शुभ किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

4/7
कन्या - या काळात तुम्हाला एखाद्या गोष्टीवर अचानक मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा काळ आव्हानात्मक असणार आहे. जर तुम्ही कोणाकडून सहकार्य किंवा पाठिंब्याची वाट पाहत असाल, तर त्यांच्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरदार वर्गासाठी आठवड्याचा उत्तरार्ध शुभ आणि भाग्यशाली असणार आहे. तुमच्या विरोधकांच्या युक्ती अयशस्वी ठरतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढेल. प्रेम संबंधात अनुकूलता राहील. या आठवड्यात आयुष्यात अनेक असे वळण येतील जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेम-भागीदाराला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल.शुभ रंग: तपकिरी (Brown)
शुभ अंक: 4
कन्या - या काळात तुम्हाला एखाद्या गोष्टीवर अचानक मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा काळ आव्हानात्मक असणार आहे. जर तुम्ही कोणाकडून सहकार्य किंवा पाठिंब्याची वाट पाहत असाल, तर त्यांच्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरदार वर्गासाठी आठवड्याचा उत्तरार्ध शुभ आणि भाग्यशाली असणार आहे. तुमच्या विरोधकांच्या युक्ती अयशस्वी ठरतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढेल. प्रेम संबंधात अनुकूलता राहील. या आठवड्यात आयुष्यात अनेक असे वळण येतील जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेम-भागीदाराला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल.शुभ रंग: तपकिरी (Brown)शुभ अंक: 4
advertisement
5/7
तूळ रास (Libra)तूळ राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या शक्ती, बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या बळावर त्यांची स्वप्नं पूर्ण करू शकतील. हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी सुधारक सिद्ध होऊ शकतो. तुमच्यावर सुख आणि सौभाग्याची वर्षाव होईल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की तुम्हाला काही काळापासून त्रास देणाऱ्या समस्या सहजपणे सुटत आहेत. तुम्ही भूतकाळात केलेल्या बचत आणि गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला या आठवड्यात मिळायला लागेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील.

6/7
तूळ - या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या सहकारी आणि वरिष्ठांचा वेळोवेळी पाठिंबा मिळत राहील. व्यावसायिक लोकांचे बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे बाहेर पडतील. आठवड्याच्या उत्तरार्धात सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांशी विशेष पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. प्रेम संबंधात परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल. तुम्हाला तुमच्या प्रेम-भागीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.शुभ रंग: क्रीम (Cream)
शुभ अंक: 9
तूळ - या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या सहकारी आणि वरिष्ठांचा वेळोवेळी पाठिंबा मिळत राहील. व्यावसायिक लोकांचे बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे बाहेर पडतील. आठवड्याच्या उत्तरार्धात सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांशी विशेष पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. प्रेम संबंधात परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल. तुम्हाला तुमच्या प्रेम-भागीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.शुभ रंग: क्रीम (Cream)शुभ अंक: 9
advertisement
7/7
वृश्चिक रास (Scorpio) - वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात छोट्या फायद्यासाठी मोठे नुकसान करणं टाळलं पाहिजे. आठवडाभर परिस्थिती चढ-उताराची असल्यानं तुम्हाला कोणताही घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोडा दिलासा मिळू शकतो, पण सध्या काळ पूर्णपणे अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही. या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवण्याची आणि विरोधकांपासून सावध राहण्याची गरज असेल. या काळात तुमचं काम दुसऱ्यांवर सोडण्याची चूक करू नका; अन्यथा केलेलं कामही बिघडू शकतं. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं आरोग्य तुमच्या चिंतेचं मोठं कारण बनेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो. या काळात काही घरगुती समस्या तुमच्या चिंतेचं कारण बनू शकतात. अंतरंग संबंध सुधारण्यासाठी, बोलताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. प्रेम संबंधात वादविवाद करण्याऐवजी संवादातून कोणताही गैरसमज दूर करा.शुभ रंग: गुलाबी
शुभ अंक: 10
वृश्चिक रास (Scorpio) - वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात छोट्या फायद्यासाठी मोठे नुकसान करणं टाळलं पाहिजे. आठवडाभर परिस्थिती चढ-उताराची असल्यानं तुम्हाला कोणताही घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोडा दिलासा मिळू शकतो, पण सध्या काळ पूर्णपणे अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही. या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवण्याची आणि विरोधकांपासून सावध राहण्याची गरज असेल. या काळात तुमचं काम दुसऱ्यांवर सोडण्याची चूक करू नका; अन्यथा केलेलं कामही बिघडू शकतं. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं आरोग्य तुमच्या चिंतेचं मोठं कारण बनेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो. या काळात काही घरगुती समस्या तुमच्या चिंतेचं कारण बनू शकतात. अंतरंग संबंध सुधारण्यासाठी, बोलताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. प्रेम संबंधात वादविवाद करण्याऐवजी संवादातून कोणताही गैरसमज दूर करा.शुभ रंग: गुलाबीशुभ अंक: 10
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement