T20 World Cup आधी मोठा उलटफेर, दुबळ्या ओमानकडून श्रीलंका अ पराभव, वाचा Match Report
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टी20 वर्ल्ड कप 2026 ला सूरू व्हायला आता अवघे 4 दिवस उरले असताना मोठा उलटफेर झाला आहे. खरं तर वर्ल्ड कप सूरू होण्याआधी अनेक संघांमध्ये वॉर्मअप मॅच खेळवले जात आहेत. या सामन्या दरम्यान एक धक्कादायक निकाल लागला आहे.
T20 World Cup News : टी20 वर्ल्ड कप 2026 ला सूरू व्हायला आता अवघे 4 दिवस उरले असताना मोठा उलटफेर झाला आहे. खरं तर वर्ल्ड कप सूरू होण्याआधी अनेक संघांमध्ये वॉर्मअप मॅच खेळवले जात आहेत. या सामन्या दरम्यान एक धक्कादायक निकाल लागला आहे.दुबळ्या समजल्या जाणाऱ्या ओमानने श्रीलंका अचा पराभव केला आहे.त्यामुळे वर्ल्डकपआधी मोठा उलटफेर झाला आहे.
श्रीलंका अ ने ओमानसमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानच्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती.ओमानकडून आमीर कलीम आणि हम्मद मिर्झा सलामीला उतरले होते.यावेळी हम्मद मिर्झा अवघ्या 5 धावांवर आऊट झाला होता.त्यानंतर विकेटची लाईनच लागली वसिम अली 2 धावा, करण सोनावले 8 धावा, मोहम्मद नदीम यांनी शून्य धावा केल्या होत्या.
advertisement
ओमानचे एका मागोमाग विकेट पडत असताना तिकडे आमीर कलीमने एका बाजूने डाव सावरला होता.त्यानंतर विनायक शुक्ला मैदानात यावेळी दोघांमध्ये चांगली पार्टनरशीप झाली. पण पुढे जाऊन आमीर कलीह हा 47 बॉलमध्ये 80 धावा करून बाद झाला.या खेळीत त्याने 3 षटकार आणि 8 चौकार लगावले होते.
आमीर कलीमने 80 धावांची खेळी करून अर्धा सामना आपल्या पारड्यात खेचून आणला होता. त्यानंतर विनायक शुक्लाने 24 बॉलमध्ये 39 धावांची नाबाद खेळी केली.या खेळीच्या बळावर ओमानने 18 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत 5 विकेटने सामना जिंकला होता.त्यामुळे वर्ल्डकप सूरू होण्याआधी हा मोठा उलटफेर होता.
advertisement
तसेच श्रीलंकेकडून वानुजा सहनने सर्वाधिक 3 तर कर्णधार लाहीरू समरकून आणि कविना गमागेने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
श्रीलंकेच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 145 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून वानुजा सहनने सर्वाधिक 29 धावा केल्या होत्या. या व्यतिरीक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या त्यामुळे श्रीलंका फक्त 145 धावा करू शकली होती. तर ओमानकडून जय ओडेड्रा, शकील अहमद आणि शाह फैसलने प्रत्येकी 2 विकेट काढले होते तर नदीन खानला एक विकेट मिळाली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 6:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup आधी मोठा उलटफेर, दुबळ्या ओमानकडून श्रीलंका अ पराभव, वाचा Match Report








