advertisement

T20 World Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी? इथे पाहा टाईमटेबल!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तारखांची आयसीसीने घोषणा केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे.

T20 World Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी? इथे पाहा टाईमटेबल!
T20 World Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी? इथे पाहा टाईमटेबल!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तारखांची आयसीसीने घोषणा केली आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. गतविजेत्या टीम इंडियाचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. मागच्या टी-20 वर्ल्ड कप प्रमाणेच यंदाही 20 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 20 टीमना प्रत्येकी 5-5 टीमच्या 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे.
टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या टीमचा समावेश आहे. याआधी मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत, पाकिस्तान, अमेरिका एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातला सामना मुंबईमध्ये तर भारत-नामिबियाची मॅच दिल्लीला होईल. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
advertisement

पाकिस्तानचे सामने कोलंबोमध्ये

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामना श्रीलंकेमध्ये होणार आहेत. पाकिस्तानची टीम सेमी फायनल तसंच फायनलला पोहोचली तर हे दोन्ही सामने श्रीलंकेमध्येच होतील. तसंच पाकिस्तान सेमी फायनल आणि फायनलला पोहोचली नाही, तर हे सामने भारतात खेळवले जातील. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतातल्या 5 तर श्रीलंकेतल्या 3 स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. भारतात मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकात्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच होतील. तर श्रीलंकेत आर प्रेमदासा, सिनहलसी आणि केन्डीमध्ये सामने खेळवले जातील.
advertisement

टीम इंडियाचं वेळापत्रक

7 फेब्रुवारी- भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई
12 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली
15 फेब्रुवारी- भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
18 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नेदरलँड्स, अहमदाबाद

या 20 टीम सहभागी होणार

भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, युएई
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी? इथे पाहा टाईमटेबल!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement