T20 World Cup : पाकिस्तानच्या खेळाडूने झिम्बाबेला बनवलं 'सिंकदर'! 2 वर्षात वर्ल्डकपची डेंजर टीम कशी बनली?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
झिम्बाबे नुसती सुपर 8 ला पोहोचली नाही तर ती थेट ग्रुप बी मध्ये टेबल टॉपर बनली आहे. झिम्बाबेच्या खालोखाल श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य संघ आहेत. क्रिकेट वर्तुळात असं दृष्य कधीच पाहायला मिळालं नव्हतं. विशेष म्हणजे झिम्बाबेसाठी देखील हे अजिबात सोप्प नव्हतं, पण मागच्या दोन वर्षात पाकिस्तानात जन्मलेल्या एका खेळाडूने हे शक्य करून दाखवलं आहे.
T20 World Cup 2026 : यजमान श्रीलंकेचा पराभव करून झिम्बाबेची टीम सूपर 8 ला पोहोचली आहे.विशेष म्हणजे झिम्बाबे नुसती सुपर 8 ला पोहोचली नाही तर ती थेट ग्रुप बी मध्ये टेबल टॉपर बनली आहे. झिम्बाबेच्या खालोखाल श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य संघ आहेत. क्रिकेट वर्तुळात असं दृष्य कधीच पाहायला मिळालं नव्हतं. विशेष म्हणजे झिम्बाबेसाठी देखील हे अजिबात सोप्प नव्हतं, पण मागच्या दोन वर्षात पाकिस्तानात जन्मलेल्या एका खेळाडूने हे शक्य करून दाखवलं आहे. हा खेळाडू नेमका कोण आहे? आणि झिम्बाबे इतकी डेंजर टीम कशी बनली? हे जाणून घेऊयात.
सर्व प्रथम 2024 पासूनचा झिम्बाबेचा प्रवास पहिल्यांदा जाणून घेऊयात. झिम्बाबेची टीम वर्ल्ड कप 2024 साठीचा क्वालिफायर सामना खेळत होती. त्या दिवशी तारीख होती 26 नोव्हेंबर 2023.झिम्बाबेला काही केल्या हा सामना जिंकायचा होता. त्यांच्यासमोर होती युगांडा टीम. झिम्बाबेने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 136 धावा केल्या होत्या. टॉप ऑर्डर अपयशी ठरला आणि मिडल ऑर्डर देखील फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे युगांडाने नुसता सामना जिंकला नाही तर झिम्बाबे वर्ल्डकप खेळायचं स्पप्न देखील मोडलं. झिम्बाबेसाठी ही हार खूपच धक्कादायक होती. पण त्यानंतर आज 3 वर्षानंतर क्वालिफायरमध्ये हरणारी टीम सिंकदर रझाच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन्स संघांसमोर आव्हान निर्माण करतो आहे.
advertisement
झिम्बाबने ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करुन सिद्ध केलं की ऑस्ट्रेलिया विरूद्ध त्यांनी मिळवलेला विजय एका दिवशी लागलेला तुक्का नव्हता. ही टीम आता ग्रुप बी मधली टॉप टीम बनून सूपर 8 ला पोहोचली आहे. जिथे झिम्बाबेचा नॉकआऊटमध्ये सामना हा साऊथ आफ्रिका, वेस्टइंडिज आणि भारतासोबत होणार आहे.दरम्यान या वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे आतापर्यंत झिम्बाबेने खेळ केला आहे ते पाहता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की सूपर 8 मधील भारतासह इतर संघासमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात.
advertisement
हा तोच संघ आहे जो शेवटच्या वेळी वर्ल्ड कपच्या सूपर सिक्समध्ये 2003 ला पोहोचला होता. त्यानंतर 2022 मध्ये टीम सूपर 12 मध्ये पोहोचली होती. त्यानंतर 2024 मध्ये क्वालिफायही करू शकली नाही, पण आता 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करते आहे, ज्याची कुणी अपेक्षा देखील केली नाही. विशेष म्हणजे ग्रुप मधले सगळे चार पैकी चार सामने जिंकण्यापासून फक्त पाऊसच आम्हाला रोखू शकला, हे सहाय्यक कोच डियोन इब्राहिमचे विधान दर्शवते की संघाचा आत्मविश्वास किती वाढलेला आहे.
advertisement
दोन वर्षात चमत्कार कसा झाला?
जिम्बाबेच्या या करिश्मेमागे सिंकदर रझाचा मोलाचा वाटा आहे.सिंकदर रझाच्या खांद्यावर जेव्हा झिम्बाबेच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाला तेव्हा क्रिकेट बोर्ड आर्थिक समस्येतून जात होतं. त्यात संघात सतत पराभवाला सामोरे जावे लागत होते. या सगळ्या परिस्थितीत सिंकदर संघाच्या पाठिचा कणा बनला आणि आपल्या ऑलराऊंडर खेळीने त्याने संघाला लढायला शिकवले.
advertisement
2023 ते 2024 पर्यंत दोन वर्ष सिंकदरने गोलंदाजीत 70 विकेट घेतले आणि शेकडो धावा केल्या. या दरम्यान सिंकदरला आयसीसी प्लेअर ऑफ द ईयर सारख्या पुरस्कारांसाठी मानांकन मिळाली.त्याने व्हाईट बॉल प्लेअर्सच्या क्रमवारीत जागा मिळवली. सिकंदरने टीमला शिस्तबद्ध केलं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि जो जिता वही सिंकदर!हे मंत्र दिलं आणि झिम्बाबेचा तो पोस्टर बॉय बनला.
advertisement
सिंकदरने संघात लढाऊपणा आणला
सिंकदर रझाच्या लिडरशीपने टीमला सर्वात जास्त बदललं, त्याने खेळाडूंना साथ दिली आणि त्यांची खेळी आणि विचारधारेला बदलून टाकलं. तसेच रझाने टीममध्ये चांगले बदल केले, जसे ब्लेसिंग मुजारबानी सोबत क्रेग इवांस सारख्या खेळाडूंना संघात घेतलं. नवीन टॅलेंटला संघात संधी दिली. संघाने लीग क्रिकेटवर फोकस केला, ब्रेक न घेता क्रिकेट खेळत राहिले आणि त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा रिझल्ट आता तुमच्यासमोर आहे.
advertisement
2024 ला क्वालिफाय न करणे संघासाठी खूपच हार्टब्रेकींग होते. त्यानंतर टीमने सलग 18 महिने मेहनत घेतली. कर्णधार सिंकदर रझाने संघाला लढायला शिकवलं. जेव्हा या वर्ल्डकपचा क्वालिफाय केनिया सब रिजनमध्ये खेळला गेला तेव्हा झिम्बाबेने रवांडा आणि तंजानियाच्या संघाविरूद्ध जिंकण्याचा असा सिलसिला सूरु केला जो 13-0 वर थांबला. सहाय्यक कोच इब्राहिमच्या मते क्वालिफायरआधी आम्हाला सलग बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाविरूद्ध हार मिळाली.या पराभवातून आम्ही शिकलो आणि खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केले आणि या सगळ्या गोष्टीचा निकाल आता तुमच्यासमोर आहे.
सिकंदर रझाचा जन्म 24 एप्रिल 1986 रोजी पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला. लहानपणीच त्याची पायलट होण्याची इच्छा होती आणि त्यांनी पाकिस्तान हवाई दलात अर्जही केला होता, परंतु डोळ्यांच्या समस्येमुळे त्यांचे स्वप्न भंगले. त्यानंतर ते सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी सुरुवातीला वेगवान गोलंदाज म्हणून क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली, परंतु नंतर ते अष्टपैलू बनले. 2002 मध्ये त्यांचे कुटुंब झिम्बाब्वेला स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तेथे देशांतर्गत क्रिकेट खेळले आणि संघात स्थान मिळवले. 2013 मध्ये त्यांनी बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले.आज तब्बल 13 वर्षानंतर या खेळाडूने झिम्बाबेचा चेहरामोहरा बदलला आहे.
झिम्बाबेची टीम आता सूपर 8 मध्ये काय उलटफेर करते? भारत, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज समोर कसं आव्हान निर्माण करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 5:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तानच्या खेळाडूने झिम्बाबेला बनवलं 'सिंकदर'! 2 वर्षात वर्ल्डकपची डेंजर टीम कशी बनली?









